जाहिरात

Indurikar Maharaj Son-in-law : शेती अन् मुंबईत नामांकित व्यवसाय; इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत?

आपल्या कीर्तनातून लोकांना जगण्याचे धडे देणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) सध्या मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आले आहेत.

Indurikar Maharaj Son-in-law : शेती अन् मुंबईत नामांकित व्यवसाय; इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत?

Indurikar Maharaj Daughter Engagement : आपल्या कीर्तनातून लोकांना जगण्याचे धडे देणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) सध्या मुलगी ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे पार पडला. या साखरपुडा सोहळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान छोटेखाली आणि साधेपणाने लग्न करा असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात मात्र लाखोंचा खर्च केल्याचं दिसून येत आहे. या साखरपुड्यासाठी घेतलेल्या लॉन्ससाठीच सव्वा ते दीड लाखांचा खर्च करण्यात आला. 

कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई? (Indurikar Maharaj's son-in-law)

4 नोव्हेंबर रोजी इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे पार पडला. या साखरपुड्याची चर्चा सुरू असताना इंदुरीकर महाराजांचा जावई कोण आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. इंदुरीकर महाराजांच्या जावयाचं नाव साहिल चिलप (Indurikar Maharaj's son-in-law Sahil Chilap) आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, साहिल चिलप (Who is Sahil Chila) हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. त्यांचा वडिलोपार्जित गाड्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीच्या अनेक गाड्या असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय त्यांचा मुंबईत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायही आहे.  इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. 

नक्की वाचा - VIDEO: 'लग्न साधं केलं तरी पोरं होतात', मुलीच्या साखरपुड्यानंतर इंदोरीकर महाराज ट्रोल

साखरपुड्याच्या कार्यक्रमाचा दिमाख

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वसंत लॉन्स येथे हा साखरपुडा पार पडला. महाराजांचा राज्यभर संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निमंत्रणे दिली गेली होती आणि कार्यक्रमाला 2000 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची माहिती आहे. लॉन्सचे एका दिवसाचे भाडे सुमारे दीड लाख रुपयांच्या आसपास होते. मोठ्या प्रमाणात सजवलेली वाहने आणि अन्य व्यवस्था देखील तिथे होती.

जेवण साधे, पण  विविध पदार्थ मेन्यूमध्ये होते. भव्य सजावट, वधू-वरांसाठी आगमन रथ, फॉग स्टाईलने अंगठी घालणे, फोटोग्राफर आणि रील मेकरची व्यवस्था होती. महाराजांच्या उपदेशानुसार, खुर्ची प्रथा बंद करण्यात आली होती आणि सर्वांसाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती, यात राजकीय मंडळी देखील खाली बसल्याचे दिसले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com