जाहिरात

Mumbai News : सचिन अहिरचं का? डॉनचा भाचा, ठाकरेचे विश्वासू असे निघून का गेले? राजकीय समीकरण नेमकी काय आहेत?  

आज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सलग दुसरा धक्का दिला आहे. खासदार फुटीनंतर मराठवाडा-विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या ठाकरेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला.

Mumbai News : सचिन अहिरचं का? डॉनचा भाचा, ठाकरेचे विश्वासू असे निघून का गेले? राजकीय समीकरण नेमकी काय आहेत?  

वैष्णवी राऊत, प्रतिनिधी

Sachin Ahir : आज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सलग दुसरा धक्का दिला आहे. खासदार फुटीनंतर मराठवाडा-विदर्भ दौऱ्यावर असणाऱ्या ठाकरेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला. तो आमदार सचिन अहिर यांच्या रूपात. 

नेमकं काय घडलं? 


आज विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत होती. आणि महायुतीकडून ही जागा शिवसेनेकडे होती. सुरुवातीला सत्ताधारी शिवसेनेकडून (शिंदे गट) नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत होतं. मात्र, शेवटच्या क्षणी शिंदे गटाने ठाकरे गटाचे सचिन अहिर यांचा अर्ज भरला. तो फोटो समोर आला आणि राजकीय भूकंप झाला. अशात एक प्रश्न आवर्जून उपस्थित झाला तो म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांचं नाव विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी का पुढे केलं? 

याची कारणं समजून घ्यायची असेल, तर आधी अहिर यांचा राजकीय कार्यकाळ पाहायला हवा... 

- सचिन अहिर यांचा राजकीय कार्यकाळ  

1) सुरुवात (1990s)

कामगार चळवळीतून राजकारणात प्रवेश
मुंबईतील ट्रेड युनियन आणि कामगार संघटनांमध्ये सक्रिय भूमिका

2) आमदार म्हणून कारकीर्द (1999–2009)

1999: शिवडी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार (MLA)
2004: शिवडी दुसऱ्यांदा निवडून आले
2009: मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वरळीतून तिसऱ्यांदा आमदार झाले

3) मंत्रीपदाचा कालावधी (2009–2014)

2009: महाराष्ट्र सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री (MoS Housing)
झोपडपट्टी पुनर्वसन, गृहनिर्माण, कामगार आणि इतर विभागांमध्ये जबाबदाऱ्या

5) पक्ष बदल (2019)

दीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये काम केल्यानंतर
2019 मध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मध्ये प्रवेश

6) विधान परिषदेतील प्रवेश (2022)

जुलै 2022: विधान परिषदेवर (MLC) निवडून आले
शिवसेना (अविभाजित/UBT) गटातून त्यांची निवड झाली

7) सध्याचा टप्पा (2026)

MLC म्हणून कार्यरत

सचिन अहिर आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींशी नातं...

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि सचिन अहिर यांचं नातं आहे. सचिन अहिर हे अरुण गवळी यांचे भाचे आहेत. अरुण गवळी यांची बहीण आशालता यांचे पूत्र म्हणजे सचिन अहिर. 

राजकीय समीकरण समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे...

मुद्दा 1 - 
ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का देणे: सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील महत्त्वाचे नेते आणि विधान परिषद सदस्य होते. त्यांना थेट उपसभापतीपदाची उमेदवारी देऊन शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा राजकीय संदेश दिला. एक म्हणजे ते वरळीतून आमदार राहिलेले आहेत, जो सध्या आमदार आदित्य ठाकरेंचा गड आहे. अहिर यांनी वरळीत ग्राऊंडवर काम केलंय. आदित्य ठाकरेंसाठी त्यांनी वरळीतील खिंड लढवली आहे. अशात त्यांना घेऊन शिंदेंनी थेट आदित्या ठाकरेंवर घाव घातलाय. 


मुद्दा २- 
मुंबईतील सामाजिक आणि संघटनात्मक समीकरण: फक्त वरळीनाही तर त्यांचा संपूर्ण मुंबईत काम आहे. सचिन अहिर यांचे कामगार संघटना, मुंबईतील स्थानिक राजकारण आणि विविध समाजघटकांमध्ये नेटवर्क मजबूत मानले जाते. त्यामुळेच ते तीन वेळा आमदार आणि राज्यमंत्रीही राहिले आहेत. अगदी शिंदेंनीच त्यांना पत्रकार परिषदेत 'ग्रासरुटचा नेता' असं म्हटलंय. 

मुद्दा ३- 
पक्षांतराला तात्काळ मोठे पद: शिंदे गटात प्रवेश करताच अहिर यांना उपसभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे इतर नेत्यांनाही "आमच्याकडे आल्यास मोठी राजकीय संधी मिळू शकते" असा संदेश जातो. शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले- शिवसेना कार्यकर्त्याचा पक्ष आहे. शिवसैनिकांना न्याय देणारा नेता म्हणून अहिर यांची ओळख आहे. अशात आता ते केवळ मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देतील. यातून शिंदेंनी इतर नेत्यांना असा एक संदेशही दिलाय की, जर तुम्ही आमच्यासोबत आलात तर केवळ एका तालुका, जिल्ह्यापूरता नाही तर तुमचा राज्यस्तरीय नेतृत्व विकास होईल. 

मुद्दा ४ - 
राजकीय लाभ जास्त: एक म्हणजे शिंदे गटात उपसभापतीपदासाठी अनेक इच्छूक होते. नीलम गोऱ्हे, हेमंत पाटील. पण जर शिंदेंनी आधीपासूनच आपल्या गटातील एखाद्या नेत्याला उमेदवारी दिली असती, तर तो नियमित निर्णय ठरला असता. अशात विरोधी गटातील वरिष्ठ नेत्याला आपल्या बाजूला आणून त्यालाच उमेदवारी देणे हा अधिक मोठा राजकीय संदेश ठरतो. शिंदेंची ताकद वाढतेय, असा संदेश जाऊ शकतो. फक्त विरोधकांनाच नाही तर सत्ताधारी मित्रपक्षांनाही!

सोबत अहिर यांना 2 पक्षांचा अनुभव आहे. राष्ट्रवादी आणि अविभक्त तसंच विभक्त शिवसेना. राजकीय रणनीती ते समजतात. ज्याचा फायदा शिंदेंना होऊच शकतो, तसंच उपसभापती म्हणूनही ते पद चांगलं स्वीकारू शकतात, असा शिंदेंना विश्वास वाटतो. म्हणूनच शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले असावे- एकनाथ शिंदे जे करतो ते 'फुल्ल प्रूफ' करतो.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com