Pratap Sarnaik News: परिवहन मंत्र्यांनी माणुसकी जपली! रॅपिडोला दणका पण बाईक चालकाला पैसे दिले

Transport Minister Pratap Sarnaik Cathches Illegal Rapido Bike: नव्या ई-बाईक धोरणानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईकला परवानगी देण्यात येणार आहे, हे स्पष्ट असतानाही काही बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे नियम मोडत असल्याचे निदर्शनास आले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pratap Sarnaik catches Rapido bike operating illegally: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बाईक टॅक्सीची सेवा पुरवणाऱ्या रॅपिडोवर कारवाई केली. स्वतः प्रताप सरनाईक यांनी नाव बदलून राईड बूक केली. मंत्रालयाबाहेर त्यांना घेण्यासाठी गाडी आल्यानंतर ज्या कंपनीच्या ॲपच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी त्यांनी संबंधित बाईक चालकाला 500 रुपये देत माणुसकीचे दर्शन घडवले. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्य शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीररित्या ॲपद्वारे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून थेट कारवाई करण्यात आली. शासनाने जाहीर केलेल्या नव्या ई-बाईक धोरणानुसार केवळ इलेक्ट्रिक बाईकला परवानगी देण्यात येणार आहे, हे स्पष्ट असतानाही काही बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे नियम मोडत असल्याचे निदर्शनास आले.

याची खात्री करण्यासाठी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्वतःच अनोळखी नावाने बुकिंग करून मंत्रालय परिसरात रॅपिडो बाईक बोलावण्यात आली आणि ही अवैध सेवा रंगेहात पकडण्यात आली. सरकारी अधिकाऱ्यांकडून “कोणतीही अनधिकृत बाईक सेवा अस्तित्वात नाही” असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे उघड झाले.

(नक्की वाचा: OLA, Uber : ओला, उबेरचं भाडं दुप्पट होणार, सरकारनं दिली परवानगी! वाचा काय आहेत नियम?)

दरम्यान, अशा बेकायदेशीर सेवांवर तर कठोर कारवाई होणारच आहे, शिवाय चुकीची माहिती देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. असं त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्या चालकाचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः ५०० रुपये देत मानवी संवेदनाही जपली. तुझ्यासारख्या गोरगरिबावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. तथापि, या मागे लपलेल्या बड्या धेंडाना शासन झाले पाहिजे! हाच आमचा हेतू आहे." असे सरनाईक यांनी सांगितले.

Advertisement