Sangli News : सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका भागामध्ये महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार केल्याचं निदर्शनास आले आहे. या महिलेच्या दारातच बकऱ्याचं मुंडके आणि चार पाय अडकवले होते. हा जादूटोणा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून कुटुंबीयाचे आणि नागरिकांचे प्रबोधन केले. तर पोलिसांच्या उपस्थितीत सर्व साहित्य बाजूला करून त्यांच्यात तयार झालेली भीती दूर करण्यात आली. या घटनेची तक्रार घरातील महिलांनी पोलिसांकडे केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इस्लामपूर उरून भागात एका महिलेला तिच्या दारात पहाटेच्या दरम्यान जादूटोणा करण्याचे साहित्य आढळून आलं. त्यांच्या दारात बकऱ्याचं मुंडके चार पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते. त्यावर लिंबू, सुया, पिना टोचलेल्या होत्या. दारातच तीन नारळाला काळ्या बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही टाचण्या लावलेल्या होत्या.
नक्की वाचा - Ghost Tree : रात्रीच्या अंधारात चमकणारं 'भुताचे झाड', पाहा VIDEO
तर 21 लिंबू अर्धवट कापलेले होते त्यावरही पिणा टोचलेले समोर ठेवलेले होते. शिवाय मिरच्या, पपई चे तुकडे हळदीकुंकू गुलाल टाकलेला होता. परिसरात सर्वसामान्य नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती समजतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजीव बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि नागरिकांचे आणि घरातील महिलांचे प्रबोधन केलं.