
विशाल पुजारी, कोल्हापूर
समृद्धी महामार्गामुळे 700-750 किमीचं अंतर अवघ्या 8 तासात कापता येणार आहे. मात्र कोल्हापुरात रस्त्याअभावी महिलेला रुग्णालयात पोहोचायला उशीर झाल्याने जीव गमवावा लागला आहे. कोल्हापूर शहरापासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेंडाई धनगर वाडा येथे ही घटना घडली आहे. दगडूबाई देवणे असं मृत महिलेचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूरच्या करवीर तालुक्याच्या बेंडाई धनगर वाड्यातील दगडूबाई यांना शेतात काम करताना चक्कर आली. उन्हामुळे महिलेची तब्येत बिघडल्याने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे गरजेचं होते. मात्र रस्ता नसल्याने ग्रामस्थांना महिलेला खाटल्यावरून उपचारासाठी खांद्यावर उचलून चालत जावं लागलं.
(नक्की वाचा- Prajakta Mali : प्राजक्ता माळीने अख्ख्या जगालाच केलं चॅलेन्ज, नॉनव्हेज खाण्यावरून तोडले अकलेचे तारे!)
भर उन्हात पायपीट करत ग्रामस्थ आणि घरच्यांनी दगडूबाई यांना रुग्णालयात नेले. मात्र ज्याची भीती होती तेच झाले. उशीरा पोहोचल्याने दगडूबाई यांनी तब्येत आणखीच बिघडली. डॉक्टरांनी रुग्णालयात त्यांना मृत घोषित केलं.
(नक्की वाचा- Nanded News: लग्न घरात मंडप टाकण्याचं काम, त्याच वेळी अचानक भयंकर घडलं, वरात निघण्या ऐवजी...)
एकीकडे राज्यात विकासाची गंगा वाहत आहे. दुसरीकडे लोकांना विकास दुर्बिनीतूनच दिसत नाही. प्राथमिक सोईसुविधांच्या अभावी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे, अशी स्थिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world