सौरभ वाघमारे, सोलापूर
आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात ही घटना घडली. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. चित्रा बाळासाहेब हाक्के (वय 28) पृथ्वीराज बाळासाहेब हाक्के (वय 5) आणि स्वराज बाळासाहेब हाक्के (वय 2) अशी मृतांची नावे आहेत. चित्रा कविराज उर्फ दत्तात्रय हाके आणि स्वराज कविराज हाके यांचा मृतदेह सापडला आहे. मात्र पृथ्वीराज कविराज हाके याचा शोध सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रा या पतीसह शेती करतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी. मोठा मुलगा पृथ्वीराज हा गतीमंद होता. त्याच्या उपचारावर मोठा खर्च येत होता. दुसरा मुलगा स्वराज यास ऐकू कमी येत होते. त्याच्यावरही उपचार सुरू होते. यामुळे चित्रा या मानसिक तणावात होत्या अस सांगितलं जात आहे.
(नक्की वाचा- MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
मलाच अशी मुले का? असे त्या वारंवार म्हणत. दरम्यान, याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिली नाही. चित्रा यांनी दोन मुलासह शेतातील 50 ते 60 फूट विहीरीत उडी टाकल्याचा संशय आहे. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
( नक्की वाचा : Jayant Patil : ' आमचा दारुण पराभव झालाय... माझं काही खरं नाही', जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ )
स्वराज याचा मृतदेह तरंगत असल्याने तो काढण्यात आला. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते. सोलापुरातील अग्निशमन पथकाने जाऊन चित्रा यांचा मृतदेह बुधवारी सायंकाळी सहा वाजता बाहेर काढला. पृथ्वीराजचा शोध रात्री उशीरापर्यंत सुरू होता.