विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या, वाशिमधील शाळेतील धक्कादायक प्रकार

Washim Naws : सरकारच्या योजनेअंतर्गत जे पुरवठादार जिल्ह्यातील शाळेला चॉकलेटचा पुरवठा करतात ते चॉकलेट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

साजन ढाबे, वाशिम

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंतप्रधान पोषणशक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी शासन स्तरावरावरून अन्न वाटप केले जाते. वाशिम जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत वाटप करण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याची घटना वाशिम तालुक्यातील अडोळी येथील जिल्हा परिषद शाळेत समोर आली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना या चॉकलेटचे वाटप करण्यात येतात. मात्र अडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाटप करण्यात येणाऱ्या चॉकलेटची एक्सपायरी डेट आधीच या चोकलेटमध्ये अळ्या निघाल्याने सदर चोकलेट दर्जाहीन असल्याचे लक्षात आले आहे.

दर्जाहीन चोकलेट विद्यार्थ्यांना वाटप होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सदृढ व निरोगी बनवायचे असेल तर त्यांना काजू बदाम देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी केली आहे.

(नक्की वाचा-  बदलापूरच्या 'त्या' शाळेच्या संचालक मंडळात भाजपच नव्हे, तर शिवसेना आणि उबाठाचेही नेते)

सरकारच्या योजनेअंतर्गत जे पुरवठादार जिल्ह्यातील शाळेला चॉकलेटचा पुरवठा करतात ते चॉकलेट हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. या चॉकलेटपासून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका आहे. त्यामुळे ही योजना बंद करून अशा निकृष्ट दर्जाचे दर्जाहीन आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला हानिकारक चॉकलेट पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  केंद्र सरकारची 'युनिफाइड पेन्शन स्कीम'ला मंजुरी, 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा)

आडोळी गावातील या प्रकारानंतर वाशिम जिल्ह्यातील इतर शाळांनी सुद्धा या चॉकलेटची तपासणी केली असता अशाच अळ्या आणखी पाच ठिकाणी निघाल्याची  माहिती मिळाली आहे. वाशिम जिल्ह्यात याआधी गर्भवती महिलांना पुरवण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थ्यांच्या पाकिटात मागील वर्षी अळ्या निघाल्या होत्या. आता विद्यार्थ्यांसाठीच्या चॉकलेटमध्येही आळ्या निघाल्याने  पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.  या प्रकाराची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
 

Advertisement