Yavatmal Crime News : घराच्या हिस्से वाटणीवरून वाद, भावाने केली भावाची हत्या

Yavatmal Crime News : पिंपळगाव बायपासवर बालाजी मंगल कार्यालयानजीकच्या फुटपाथवर ही धक्कादायक घटना घडली. यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना मोबाीलच्या कॅमेऱ्यात कैद केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Yavatmal News : घराच्या हिस्से वाटणीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ शहराच्या पिंपळगाव बायपासवर बालाजी मंगल कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक करण्यात आली आहे. या हत्येचा व्हिडीओ देखील समोर आली आहे. 

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद पेन्डोरे (37 वर्ष) याला दारूचे व्यसन होते. तो शेती तसेच घराच्या हिस्से वाटण्यासाठी हट्ट करत होता. यातून तो कुटुंबीयांना देखील त्रास देत होता. 20 एप्रिल रोजी त्याने घरात हिस्से वाटणीसाठी खूप गोंधळ घातला होता. त्यामुळे, पेंडोरे परिवार त्रस्त होता.

(नक्की वाचा -  ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू))

अशात, लहान भाऊ कवीश्वर उर्फ बाल्या पेंडोरे याने बुधवारी 30 एप्रिल रोजी सायंकाळी मोठ्या भावाला गाठून त्याचेवर लोखंडी रॉडने हल्ला केला. याच्या डोक्यावर, तोंडावर आणि हातावर रॉडने हल्ले केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)

पिंपळगाव बायपासवर बालाजी मंगल कार्यालयानजीकच्या फुटपाथवर ही धक्कादायक घटना घडली. यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना मोबाीलच्या कॅमेऱ्यात कैद केली. याप्रकरणी पोलिसांना आरोपी बाल्या पेंडोरे याला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article