जाहिरात

Success Story: अमरावतीच्या लेकीची 'किमया', 12वी परीक्षेत केली कमाल; सर्व विषयात...

किमयाने चक्क १०० टक्के गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान पटकावले आहे. जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या किमयाने ६०० पैकी ६०० गुण मिळवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

Success Story: अमरावतीच्या लेकीची 'किमया', 12वी परीक्षेत केली कमाल; सर्व विषयात...

Amravati Kimaya Vatile Success Story:  कष्टाला जिद्दीची जोड दिली की आकाशही ठेंगणे होते, याचाच प्रत्यय यवतमाळच्या किमया शितल वातीले हिने आणून दिला आहे. बारावीच्या निकालात किमयाने चक्क १०० टक्के गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिले स्थान पटकावले आहे. जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये शिकणाऱ्या किमयाने ६०० पैकी ६०० गुण मिळवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

Baramati- Rahuri Election Result LIVE: मोठी बातमी! बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विजय; राहुरीमध्ये कमळ फुललं!

अमरावतीच्या लेकीची किमया 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा निकाल 87.75 टक्के लागला असून यामध्ये स्थानिक जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी किमया शितल वातीले हिने मोठे यश मिळवलं आहे. किमयाने  600 पैकी 600 गुण प्राप्त करीत 100 टक्के गुण मिळवित महाराष्ट्रातून प्रथम मेरिटमध्ये अव्वल स्थान तिने पटकावले आहे. त्यामुळे किमयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

 पुढे मला इंजिनियर व्हायचे आहे असं किमया हिने सांगितले. यश प्राप्त करायचे असेल तर पहिल्या दिवसापासून परिश्रम घ्यावे लागेल तसेच सोशल मीडिया. मोबाईल यापासून दूर राहणे आवश्यक आहे. जिद्द आणि चिकाटी असेल तरच यश नक्की प्राप्त होईल, असा संदेशही तिने यावेळी दिला. तसेच या सर्व यशामागे आजोबा, वडील शितल वातीले, आई ज्योती वातीले, तसेच शिक्षकांचा या मिळालेल्या यशामागे फार मोठा वाटा आहे. यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी यश प्राप्त केले आहे, अशी भावनाही किमयाने व्यक्त केली. 

Baramati Result: सुनेत्रा पवारांनी इतिहास रचला! बारामतीत रेकॉर्डब्रेक मतांनी विजय; 22 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com