जाहिरात

Yavatmal News: झाडावर चढल्या, हातात दोरी घेतली अन्... महिला कंडक्टरचे टोकाचे पाऊल, परिसरात खळबळ

Yavatmal News: सुदैवाने त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

Yavatmal News: झाडावर चढल्या, हातात दोरी घेतली अन्... महिला कंडक्टरचे टोकाचे पाऊल, परिसरात खळबळ

यवतमाळ: महिला कंडक्टरने झाडावर चढून दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडली आहे. यवतमाळमधील पुसद बस स्टँड परिसरात हा खळबळजनक प्रकार घडला. सुदैवाने त्याठिकाणी असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. 

Nagpur News: देवाच्या दारात रक्तरंजित थरार! प्रेयसीवर सपासप वार; नागपुरमध्ये भयंकर घडलं

याबाबत सविस्तर माहिती अशी की, यवतमाळच्या पुसद बस स्टँडमधील एका महिला कंडक्टरने झाडावर चढून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिस व जागरूक नागरिकांनी धाव घेतल्याने तिचा जीव वाचवण्यात यश आले आहे. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने महिलेचा जीव वाचवला. विशेषतः बसस्थानक परिसरातील सलमान नावाच्या ऑटो चालकाने झाडावर चढून धाडसाने महिला कंडक्टरला खांद्यावर उचलून खाली आणले आणि तिचा जीव वाचवण्यास मोलाचे योगदान दिले. 

 प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला कंडक्टरने एका शाळकरी मुलीला मारहाण केल्याचा तिचेवर आरोप होता. यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनमध्ये एन सी दाखल करण्यात आली होती. त्यामुळे संबंधित महिलेवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती आणि याच कारणाने तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सुदैवाने, पोलिस व नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांकडून महिलेची समुपदेशन करून पुढील उपचारासाठी तिला हलवण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे.

Nagpur Crime: दारुमुळे वडिलांचा मृत्यू! बदला घेण्यासाठी मुलाचा भलताच प्लॅन, बारमध्ये शिरायचा अन्....

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com