जाहिरात

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील 'या' सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार, वाचा IMD अलर्ट

उद्या गुरुवारी 30 जुलै 2026 रोजी विदर्भातील सात जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील 'या' सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार, वाचा IMD अलर्ट
Maharashtra Rain Forecast Latest Update

IMD Alert For Maharashtra : राज्यात मागील आठवड्यापासून पावसाची संततधार सुरूच आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणमध्ये पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.धरणेही तुडुंब भरल्याने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच उद्या गुरुवारी 30 जुलै 2026 रोजी विदर्भातील सात जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये नागपूरसह अमरावती,वर्धा,भंडारा,गोंदिया तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

चार जिल्ह्यात पुढील 3 तास यलो अलर्ट

विदर्भातील उर्वरित चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.आज सायंकाळी पाच वाजल्यानंतर नागपूर शहरात खूप मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
नागपूरसह एकूण चार जिल्ह्यात पुढील 3 तास यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नक्की वाचा >> Manoj Jarange: 'एकतर सरकार निर्णय घेईल, नाहीतर मी..', दिल्लीत मराठा आंदोलन पेटणार? मनोज जरांगेंचा मोठा इशारा

या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार,आज बुधवार दिनांक 29 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता जारी करण्यात आलेल्या पावसाच्या येलो अलर्टनुसार पुढील तीन तासांत नागपूर,भंडारा,चंद्रपूर गडचिरोली या चार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,आणि ताशी 30 ते 40 किमी सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी वर्तवण्यात आली आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com