Solpaur News: डीजेवर नाच नाच नाचला अन् धाडकन कोसळला; तरुणाचा मृत्यू

Solpaur News : तरुणाच्या मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीचा, तो डीजेच्या तालावर नाचत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

सौरभ वाघमारे, सोलापूर

सोलापूर शहरात डीजेच्या तालावर नाचत असताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिषेक बिराजदार असे या मृत तरुणाचे नाव आहे.

ही घटना शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूच्या काही क्षणांपूर्वीचा, तो डीजेच्या तालावर नाचत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(नक्की वाचा- Solapur New: आमदारकी नाही, पण लोगो मिळाला; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कारनाम्याची जिल्हाभर चर्चा)

व्हिडिओमध्ये अभिषेक आनंदाने नाचताना दिसत आहे. नाचून झाल्यावर तो काही काळ बाजूला थांबला आणि त्यानंतर जागीच कोसळला. तात्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

(नक्की वाचा-  Sambhaji Bhide News: 'सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा', संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान)

या घटनेमुळे पुन्हा एकदा कर्णकर्कश डीजेच्या आवाजाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. डीजेच्या उच्च आवाजामुळे होणारे कंप आणि हृदयविकार यांचा संबंध असल्याचा मुद्दा अनेकवेळा चर्चेत आला आहे. तरुणांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकाराच्या घटना आणि अशा प्रकारच्या आवाजाचा त्यांच्या शरीरावर होणारा परिणाम, याबद्दलची चिंता या घटनेने पुन्हा एकदा वाढवली आहे.

Advertisement

Topics mentioned in this article