जाहिरात

Dhule News : मर्चंट नेव्हीत असलेला धुळ्यातील तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता

Dhule News : यश देवरे मर्चंट नेव्हीमध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्व्हिस प्राइवेट लिमिटेडमध्ये ओएस पदावर कार्यरत आहे. सौदी अरेबियातील ओमन येथे गेला होता.

Dhule News : मर्चंट नेव्हीत असलेला धुळ्यातील तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता

नागिंद मोरे, धुळे

मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला धुळ्यातील तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. यश देवरे असं या तरुणांचं नाव आहे. यशच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आहे. यश धुळे तालुक्यातील देऊर येथील मूळ रहिवासी आहे. समुद्रात त्याचा शोध सुरु आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यश देवरे मर्चंट नेव्हीमध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्व्हिस प्राइवेट लिमिटेडमध्ये ओएस पदावर कार्यरत आहे. सौदी अरेबियातील ओमन येथे गेला असताना 28 जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबीयांचे शेवटचे बोलणे झाले होते. मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क झालेला नाही. 

(नक्की वाचा-  Saif Ali khan : जलद रिकव्हरी, रिक्षाने प्रवास, हल्ल्याबाबत संशय; सैफ अली खानने लोकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं दिलं उत्तर)

29 जानेवारीला दुपारी 2 वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजमधून पाय घसरून पडून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची माहिती दिली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला आहे. 

(नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना)

यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय आणि त्याचे निकटवर्तीय यशच्या शोधात आहे. एमटी अथेना 1 हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते. मात्र हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची देवरे कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Dhule News, धुळे न्यूज