Ahilyanagar News : हात-पाय, शीर कापलं, तरुणाची निर्घृण हत्या; तपासात समोर आलेलं हत्येचं कारण धक्कादायक 

Ahilyanagar Crime News : माऊली गव्हाणेची निरघृपणे हत्या करत कटरच्या साहायाने शीर, धड, हात-पाय कापण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे गावातीलच वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेकून दिले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, पुणे

18 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालक्यातील दाणेवाडी येथे घडली होती. मृतदेहाचे तुकडे करुन गावातील वेगवेगळ्या विहिरींमध्ये ते टाकण्यात आले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माऊली गव्हाणे या तरुणाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास करत दाणेवाडी गावातीलच सागर गव्हाणे या आरोपीला ताब्यात घेतले. आणखी एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतल्यांची माहिती आहे. 

(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)

हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार याच गावातील दोन तरुण समलैंगिक सबंध करत असताना या माऊलीने पाहिलं होतं. यामुळे आरोपींचा या माऊलीवर राग होता. या रागातून बदनामीच्या भीती ही हत्या झाल्याची माहिती आहे. मृताच्या मोबाईलमधून काही पैसे या आरोपींनी घेतले असल्याचीही माहिती आहे. 

माऊली गव्हाणेची निरघृपणे हत्या करत कटरच्या साहायाने शीर, धड, हात-पाय कापण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे गावातीलच वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेकून दिले होते.  हत्येच्या या घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. एका बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलाची एवढ्या निरघृरपणे हत्या झाल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत होते.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune Politics : पुण्यात काँग्रेसला खिंडार; रविंद्र धंगेकरानंतर जवळपास 100 पदाधिकारी पक्ष सोडणार)

हत्येनंतर माऊली गव्हाणे याचे पालक आणि नातेवाईक हे संतप्त झाले आहेत. माऊली गव्हाणे याचा मृतदेह आरोपीच्या घरासमोर जाळणार, अशी भूमिका घेतल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांकडून माऊलीच्या कुटुंबीयांची समजूत काढली जात आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

Topics mentioned in this article