Akola News: मोबाईलची उधारी न भरल्याने धिंड काढत मारहाण, अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

Akola News : अकोला जिल्ह्याच्या तेल्हाराच्या जस्तगाव शेतशिवार परिसरात निंबाच्या झाडाला शेतातच गळफास घेऊन गुरुवारी मध्यरात्री सागरने आत्महत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Akola News : अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील जस्तगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उधारीने घेतलेल्या मोबाईलचे पैसे न भरल्यामुळे मोबाईल दुकान मालक आणि त्याच्या सोबतच्यांनी सागर चिकटे या तरुणाला त्याच्या गावात जाऊन जबर मारहाण केली. मोबाईल दुकान मालक एवढ्यावरच थांबले नाही तर त्याला पळून पळून मारले आणि नंतर गावात धिंड काढली. त्यानंतर त्याला चारचाकी गाडीत बसवून अपहरण करून त्याला गावाबाहेर नेलं. यादरम्यान सागरला जबर मारहाणही करण्यात आली.  या अपमानास्पद वागणुकीनंतर सागरने टोकाचा निर्णय घेतला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गावात धिंड काढल्याने आत्महत्या

सागरने तेल्हाराच्या जस्तगाव शेतशिवार परिसरात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन गुरुवारी मध्यरात्री आत्महत्या केली. दुसऱ्यादिवशी शुक्रवारी सकाळी मनोहर चिकटे हा ट्रॅक्टर घेऊन शेतात कामाला गेला असता त्याला सागरचा मृतदेह दिसून आला.

(नक्की वाचा-  NIA मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक)

या प्रकरणी सचिन चिकटे याने सागरच्या मृत्यूस कारणीभूत मोबाईल दुकान मालक व त्याच्या साथीदारांविरोधात तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत साखरच्या मृत्यूस जबाबदार विनायक राऊत, रामप्रसाद मोकळकार, उमेश पांडे, अक्षय भारसाकळे, विनीत युतकार आणि यश युतकार यांच्या विरोधात मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

(नक्की वाचा-  अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी जॉर्जिया मेलोनींसमोर टेकले गुडघे; VDEO व्हायरल) 

सागरच्या आत्महत्येस कारणीभूत मोबाईल दुकान मालक आणि त्यांचे पाच साथीदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  मोबाईलच्या उधारीचे पैसे न दिल्याने हा सर्व प्रकार घडला. सागर दडपणात आला होता. तसेच गावात झालेल्या मारहाणीमुळे देखील तो खचला होता. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

Advertisement

दरम्यान तेल्हारा पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत.

Topics mentioned in this article