
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा इटालियन पंतप्रधान मेलोनी यांच्यासाठी रेड कार्पेटवर गुडघे टेकताना दिसत आहेत.
एडी रामा दोन्ही हात जोडून नमस्काराच्या पोझमध्ये गुडघ्यावर बसतात आणि मेलोनी समोरून येत आहेत. एडी रामाजवळ पोहोचल्यानंतर मेलोनी हसतात. त्यानंतर दोन्ही दोन्ही हस्तांदोलन करुन एकमेकांना मिठी मारतात आणि एकत्र फोटोशूट करतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
Giorgia Meloni truly commands the utmost respect of world leaders. This is quite the sight to see. pic.twitter.com/xBp3d0Qi7j
— Joey Mannarino 🇺🇸 (@JoeyMannarinoUS) May 16, 2025
अल्बेनियाची राजधानी तिराना येथे सुरू असलेल्या युरोपियन राजकीय समुदाय शिखर परिषदेत हा सगळा प्रकार घडला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तिराना येथे आल्यावर, यजमान देश अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वांसमोर रेड कार्पेटवर गुडघे टेकले.
( नक्की वाचा : भारतासोबत फक्त 18 मे पर्यंत शस्त्रसंधी, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य! )
एडी रामाची ही शैली अशी होती की लोकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांचे अशा प्रकारे स्वागत केल्याबद्दल सोशल मीडिया युजर्स त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.
(नक्की वाचा- India-Pakistan : पाकिस्तानला आली शांतीची आठवण; शाहबाज शरीफांकडून चर्चेचा प्रस्ताव)
एडी रामाने जॉर्जिया मेलोनीचे अशा प्रकारे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीच्या सुरुवातीला, अबू धाबी येथे झालेल्या वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिटदरम्यान एडी रामा यांनी इटलीचे पंतप्रधान ज्योर्जिओ मेलोनी यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अशाच पद्धतीने स्वागत केले होते. त्यावेळी त्यांनी मेलोनी यांना एक स्कार्फही भेट दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world