Nandurbar News: भिंत पडली, छत मोडकळीस... 288 विद्यार्थ्यांनी जीव मुठीत घेऊन घेतायेत शिक्षण

Nandurbar School : शाळेतील धोकादायक वर्ग खोल्यांच्या संदर्भात शालेय समिती सन 2013 पासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र अजूनही या वर्गखोल्यांची दुरुस्ती किंवा नवीन वर्ग खोल्या तयार करण्यात आलेल्या नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द येथे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमातर धोकादायक स्थितीत आहे. शाळेच्या सात पैकी पाच वर्ग खोल्या धोकादायक बनल्या असल्या तरी तिथे वर्ग भरवले जात आहेत. 

शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्यांमध्ये 288 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित वर्ग खोल्या दुरुस्त करून देण्यासाठी गावकरी 2013 पासून शासन दरबारी अर्ज करत आहेत मात्र अजूनही शाळेची दुरुस्ती न झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.

Advertisement

Nandurbar School

मांडवी खुर्द येथे जिल्हा परिषदेची केंद्र शाळा आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत येथे वर्ग असून या वर्गांसाठी सात वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी पाच वर्ग खोल्या या धोकादायक असल्याने त्या वर्ग खोल्या निर्लक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही प्रशासनाच्या वतीने नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने जिल्हा परिषद शाळेच्या या धोकादायक वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. 

शाळेतील धोकादायक वर्ग खोल्यांच्या संदर्भात शालेय समिती सन 2013 पासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. मात्र अजूनही या वर्गखोल्यांची दुरुस्ती किंवा नवीन वर्ग खोल्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. या शाळेत आल्यावर तुटलेल्या छताला लाकडी दांड्याचा आधार दिलेला दिसतो. तर भिंतीला मोठे तडे गेलेले आहेत. एका वर्ग खोलीची भिंत कोसळली आहे. अशी दयनीय अवस्था या शाळेची आहे. 

एकीकडे आपण सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क देत असलो तरी दुसरीकडे मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याचे चित्र या शाळेकडे पाहून आपल्याला दिसते.

Topics mentioned in this article