एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याला दोन वर्षे पुर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी थेट गुवाहाटी गाठले आहे. त्यानंतर हे शिवसैनिक कामाख्या देवीच्या मंदिरातही गेले. यावेळी त्यांनी नुकत्याच लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचा बॅनर झळकवला. शिवाय कामाख्य देवीला त्यांनी एक नवसही केलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 180 आमदार निवडून येवू दे असा हा नवस आहे. ज्या ठिकाणी जावून शिंदेंनी बंड केले त्याच ठिकाणा जावून ठाकरेंच्या शिवसैनिकांनी नवनिर्वाचीत खासदारांच्या छायाचित्राची मिरवणूकचं काढली. सध्या त्यांचे गुवाहाटीचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. 40 आमदारांना घेवून त्यांनी सुरत गाठले. त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. पुढे गोवा मार्गे मुंबईत परतले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या घटनेला दोन वर्ष पुर्ण होत आहेत. यावरून ठाकरेंच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाला डिवचलं आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी थेट गुवाहाटी गाठली आहे. शिवाय कामाख्या देवीला नवसही केला आहे. ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले ती गोष्ट शिवसैनिकांना पटली नाही. त्याचा बदला आता विधानसभा निवडणुकीत घेणार असे या शिवसैनिकांनी सांगितले. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत मविआला 180 जागा मिळू दे असा नवसही केला आहे. हा नवस फेडण्यासाठी परत गुवाहाटीला येवू असेही त्यांनी सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ
हे शिवसैनिक मुंबईतून गुवाहाटीला गेले आहेत. कामाख्या देवीने शिंदेंना लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही शिकवू असे शिवसैनिक म्हणाले. यावेळी शिवसैनिकांनी नवनिर्वाचीत खासदारांचे बॅनर कामाख्या देवीच्या मंदिराबाहेर झळकवले. यावेळी ढोल ही वाजवण्यात आले. ज्या ठिकाणी शिंदेंनी बंड केले त्याच ठिकाणी जावू ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अशा अनोख्या पद्धतीचे आंदोलन केले. ज्या कामाख्या देवीच्या दर्शनला वारंवार मुख्यमंत्री शिंदे जातात तिथेच हे शिवसैनिक गेले होते. त्यांचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.