विधान परिषदेत मराठा आरक्षणावरून जोरदार राडा, मार्शल बोलवले, सभागृह तहकूब केले

विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधका वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढला.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

मराठा आरक्षणाबाबत सरकाने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या वरून आज विधान परिषदेत जोरदार हंगामा झाला. भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. पण या बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहाणे गरजेचे होते. पण ते आले नाहीत असा मुद्द दरेकर यांनी उपस्थित केला. त्यानंतर विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधका वेलमध्ये जमा झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यातच उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढला. शेवटी मार्शलला बोलवा असे आदेशही गोऱ्हे यांनी दिले. पण गोंधळ थांबला नाही. शेवटी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रविण दरेकर काय म्हणाले? 

मराठा आरक्षणावरून राज्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. यावर काही तरी तोडगा निघाला पाहीजे अशी मागणी होत होती. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सरकारने एक सर्व पक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी केली. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यानुसार सह्याद्री अतिथी गृहात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. पण या बैठकीकडे राज्याचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली. त्यमुळे त्यांचे आरक्षणा बाबतचे पुतना मावशीचे प्रेम सर्वांना दिसून आले. ते सर्व जण एक्सपोज झाले असा हल्लाबोल प्रविण दरेकर यांनी केला.    

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - विधानपरिषदेला 12 वा उमेदवार देण्याची गरज नव्हती, विश्वजीत कदमांची रोखठोक भूमिका

विरोधकांचा जोरदार राडा 

प्रविण दरेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत विधान परिषदेतले वातावरण तापवले. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. त्यावेळी विधान परिषदेत एकदच गदारोळ उडाला. दोन्ही बाजूचे आमदार वेलमध्ये उतरले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याला बोलू द्यावे अशी मागणी केली. पण गदारोळ वाढत गेला. शेवटी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मार्शलला बोलवावे लागेल. मार्शलला बोलवा असे आदेश दिले. पण त्यातही गदरोळ काही कमी झाला नाही. या गदारोळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ ऐवढा  होता की त्यांना काही बोलता आले नाही. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - हॉटेल पॉलिटिक्सचा जोर; भाजप, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा मुंबईतील कोणत्या 5 स्टारमध्ये मुक्काम?

सभागृहाचे कामकाज तहकूब  

काही करून गोंधळ कमी होत नव्हता. उपसभापती सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत होत्या. पण गदारोळ कमी झाला नाही. या गदारोळात चर्चा कशी करणार असे त्या म्हणत होत्या. आधी शांत व्हा मग बोलण्याची परवानगी देते पण कोणीही ऐकण्याचे तयारीत नव्हते. अशा वेळी उप सभापती निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरा साठी तहकूब केले. 

Advertisement