Aditya Thackeray : दिशा सालियन हिचे वडील सतिश सालियन यांनी मुलीच्या हत्येच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी घडलेल्या ही घटना पुन्हा चर्चेत आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज विधानसभेतही या मुद्द्यावरुन विरोधकांना घेरण्यात आलं. अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करा आणि त्यांची कस्टोडियल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. विधानसभेत अमित साटम यांच्या मागणीवर शंभुराज देसाई यांचीही पाठिंबा दिला आणि या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
नक्की वाचा - Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या SIT चं पुढे काय झालं?; नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दिशा सालियन प्रकरणावरुन आज विधानसभा बंद पाडण्यात आली. हा प्रकार घडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही त्यांचं सत्य बाहेर आणलंय. संघानेही ओरंगजेबाचा मुद्दा सध्या प्रासंगित नसल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्राची स्थिती बिकट होत चालली आहे. आज माझ्या मुद्द्यावरुन हाऊस बंद पाडण्यात आलं... पाडूद्या...मात्र सत्ताधारी महाराष्ट्राबद्दल चर्चा करीत नाही. सध्या शेतकरी आत्महत्या आणि महाराष्ट्रातील अनेक प्रश्न आहेत. मात्र त्यावर सत्ताधारी चर्चा करीत नाहीत. कोर्टात जे होईल त्याला उत्तर दिलं जाईल असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी विधानसभेतील घडामोडींवरही लक्ष नोंदवलं. विधानसभेत मंत्री उपस्थित नसतात. विचारलेल्या प्रश्नांची अभ्यासपूर्वक उत्तरंही दिली जात नाही. अनेकदा चर्चा सुरू असताना सत्ताधारीच हाऊस बंद पाडतात, असंही ते म्हणाले.