
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नव्याने चौकशी करण्याची मागणी सतीश सालियान यांनी केली आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी आधीही याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मात्र नितेश राणे यांच्या भूमिकेत काही तथ्य नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन झालेल्या SIT ने समन्स करूनही नितेश राणे यांनी SIT समोर जाण टाळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीने नितेश राणे यांन दोन वेळा बोलावलं होतं.
(नक्की वाचा- Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्वीस्ट! माझ्या मुलीची हत्या.. वडिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप)
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी पुरावे असल्यास सादर करण्यासाठी पोलिसांनी नितेश राणे यांना समन्स केलं होतं. मात्र समन्स करूनही नितेश राणे यांनी SIT समोर उपस्थित न राहिल्याची सूत्रांची माहिती आहे.
SIT अहवालाच्या प्रतीक्षेत
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी राज्य सरकार गंभीर नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण 2022 मध्ये स्थापन केलेल्या SIT चा अहवाल अद्यापही प्रतीक्षेत आहे. तर SIT मधील तीनही अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
(नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
डिसेंबर 2022 मध्ये अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्त्वात SIT स्थापन करण्यात आली होती. तर पोलीस उपायुक्त अजयकुमार बन्सल आणि मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांचा SIT मध्ये समावेश होता. मात्र तीनही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने SIT चा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world