'मी सिनिअर, तरी दोघे माझ्या पुढे गेले' शिंदेंच्या कार्यक्रमात दादा - फडणवीसांची फटकेबाजी

मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दादांच्या टोलेबाजीनंतर फडणवीसांनीही दादांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देत ते पण एक रेकॉर्ड होते, असं सांगत एकच धम्माल उडवून दिली.

Advertisement
Read Time: 3 mins
ठाणे:

मी सिनिअर आहे. मी 1990 ला सुरूवात केली. फडवीस 1999 ला पहिल्यादा विधानसभेत आले. तर एकनाथ शिंदे 2004 ला विधानसभेत आली. पण मी मागे राहीलो आणि हे दोघे पुढे निघून गेले अशी जोरदार टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. निमित्त होतं 'योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दादांच्या टोलेबाजीनंतर फडणवीसांनीही दादांना पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देत ते पण एक रेकॉर्ड होते, असं सांगत एकच धम्माल उडवून दिली. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवारांची टोलेबाजी 

देवेंद्र फडणवीस हे 1999 साली विधानसभेत निवडून आले. तर एकनाथ शिंदे  हे 2004 साली विधानसभेत आले. मी तरी 1990 ला सुरूवात केली. त्यामुळे मी या दोघांचाही सिनिअर आहे. असं असताना मी मागे राहीलो आणि हे दोघेही माझ्या पुढे निघून गेले अशी जोरदार टोलेबाजी अजित पवारांनी केला. पुढे फडणवीसांकडे बघत अजित दादा म्हणाले, तुम्ही जसं एकनाथ शिंदेना सांगितले की इतके आमदार आणले तर मुख्यमंत्री करतो, तसं मला सांगितले असतं, तर मी संपूर्ण पक्षच घेवून आलो असतो असं बोलताच एकच हशा सभागृहात झाला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतूक केले. एकनाथ शिंदे सतत जनतेत असतात, मी अनेकदा कॅबीनेट मध्ये गर्दी बघून बोलत असतो हे काय चाललं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - तो भिंतीवरून आला, तिला गच्चीवर घेवून गेला, हातपाय बांधले अन् पुढे...

'मी पण पहाटे उठतो' 

शिंदेंच्या काही केलं तरी बातम्या होतात.  मी पण  पहाटे सहा वाजता उठतो. शेतात जातो. तिकडे कामही करतो. पण एकही मीडियावाला माझी दखल घेत नाही. अशी खंतही दादांनी यावेळी बोलून दाखवली. यावेळी बोलताना ते म्हणाले की आताही मंचावर सर्वात जास्त आमदार हे माझेच आहेत. उदय सामंतला मीच आमदार केले. दिपक केसरकर यांना मी तिकीट दिले. प्रताप सरनाईक माझाच माणूस. पण त्यांनी या सर्वांना कधी  फोडून नेलं मला कळालेच नाही असेही सांगायला यावेळी दादा विसरले नाहीत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?

फडणवीसांचीही टोलेबाजी 

अजित पवारा म्हणाले की मी मागे राहीलो. तोच धागा पकडत फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली. दादा आम्ही पुढे निघून गेलो असे तुम्ही म्हणालात. मात्र आपण दोघांनी एक रेकॉर्ड केलं आहे याची आठवण फडणवीसांनी यावेळी करून दिली. आपण 72 तासांचं सरकार चालवलं. एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री अशीपद भूषवली. तसं तुमचंही झालं आहे. असे फडणवीस म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  शेख हसीनांनी बांगलादेश सोडला, भारतात आल्या, सोबत किती संपत्ती आणली?

'शिंदेंचे रेकॉर्ड कोणी मोडणार नाही' 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा गौरव फडणवीसांनी केला. एकनाथ शिंदे यांचे रेकॉर्ड कोणी मोडू शकणार नाही. सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षा बरोबर त्यांनी सरकार स्थापन झाले. स्वत: मुख्यमंत्री झाले. असे रेकॉर्ड यापुढे कोणी करेल असे वाटत नाही असे फडणवीस म्हणाले. शिंदे पहीले वाळकेश्वर इथे राहात होते. तेव्हा कुणालाही वाटले नसेल की हा लहान मुलगा वाळकेश्वरच्याच वर्षा बंगल्यावर कधी राहायला येईल. ते शिंदेंनी करून दाखवले आहे.