दादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? 'तो'आमदार कोण?

पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवारांच्या अनेक समर्थकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच दादांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

विधानसभा निवडणूका जवळ येत आहेत. त्यानुसार राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. अनेकांना पक्ष बदलण्याचे वेध लागले आहेत. तर काहींना आपल्या पक्षात घेण्याची रस्सीखेच सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात बऱ्याच जणांनी प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर अजित पवारांच्या अनेक समर्थकांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा अजित पवारांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच दादांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार आहेत. अजित पवार गटाच्या एका आमदाराने शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. या भेटी वेळी खासदार अमोल कोल्हेही उपस्थित होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळं आता अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा रंगलेली आहे. खासदार अमोल कोल्हेच्या घरी ही भेट झाली आहे. याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. अतुल बेनके हे आत्ता कोणत्या पक्षात आहेत? मला  याची कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्यामुळं यावर फार चर्चा नको. पण लोकसभेत ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे आहेत, असं म्हणत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केले आहे. या भेटीने मात्र अजित पवारांचे टेन्शन मात्र वाढले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार

काही दिवसांपूर्वी  अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांसह  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत मोदीबाग येथे पक्षप्रवेश करण्यात आला होता. भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अन्य 18 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा गड मानला जातो. या गडालाच शरद पवारांनी तडा दिला होता. 

Topics mentioned in this article