सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune ZP Election 2026 Result Update : राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज सोमवारी जाहीर करण्यात आले. अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 'अजितदादा 9 तारखेला कमबॅक करणार..',अशा आशयाचे बॅनर्सही सोशल मीडियावर झळकले होते. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकूण 73 जागांपैकी 69 जागांच्या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 48 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादीसह कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
पक्षनिहाय निकालाची स्थिती (69/73 जागा):
राष्ट्रवादी काँग्रेस - 48
भारतीय जनता पक्ष - 10
शिवसेना (शिंदे गट) - 04
शिवसेना (ठाकरे गट)- 06
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 01
काँग्रेस - 00
अपक्ष - 00
नक्की वाचा >> ZP Election 2026: राज्यात भाजपची विजयी हॅट्ट्रिक, 'हे' 2 बडे नेते विजयाचे शिल्पकार अन् सूत्रधार
अजित पवारांना विजयाची आदरांजली
हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक क्षण ठरला आहे. ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जिद्दीने काम करत ही सत्ता खेचून आणली.'दादांचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे',अशा भावना कार्यकर्त्यांनी विजयानंतर व्यक्त केल्या. विजयाची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटली, 'या' निकालाची राज्यभर चर्चा, गड आला पण सिंह गेला..
निवडणूक दोन दिवस पुढे ढकलली होतीअजित पवार यांच्या निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली होती. परिणामी प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवसांसाठी पुढे ढकलल्या होत्या. या विलंबानंतर झालेल्या मतदानात मतदारांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात आपले मत टाकून दादांना श्रद्धांजली वाहिल्याचे दिसून येत आहे.जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीवरही राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले असून आता जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर राष्ट्रवादीची पकड अधिक मजबूत झाली आहे.