Maharashtra ZP And Panchayat Samiti Election : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपने महायुतीमधील सहकारी पक्ष आणि महाविकास आघाडीतील पक्षांना मागे टाकत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. या विजयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ही राज्यातील राजकारणातील 'जोडी नंबर 1' असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
निवडणूक नियोजनाची हॅट्ट्रिक
देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि रविंद्र चव्हाण यांच्या चोख नियोजनामुळे भाजपने राज्यात विजयाची अनोखी हॅट्ट्रिक साध्य केली आहे. नोव्हेंबरमधील नगर परिषद, जानेवारीतील महानगरपालिका आणि आता फेब्रुवारीतील जिल्हा परिषद अशा सलग तीन निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. अचूक निवडणूक नियोजन, प्रभावी प्रचार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद या जोरावर या 'पॉवरफुल' जोडीने पक्षाला हे यश मिळवून दिले आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटली, 'या' निकालाची राज्यभर चर्चा, गड आला पण सिंह गेला..
विजयाचे शिल्पकार आणि सूत्रधार
या विजयाचे मुख्य शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत, तर त्याचे मुख्य सूत्रधार रविंद्र चव्हाण ठरले आहेत. रविंद्र चव्हाण यांची ओळख 'निवडणूक सिद्ध नेता' म्हणून निर्माण झाली असून, जमिनीवर काम करणारे आणि कार्यकर्त्यांत रमणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
नक्की वाचा >> Video : पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांची पकडली कॉलर, काय घडलं?
त्यांच्या निवडणूक कौशल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ आणि पाठिंबा मिळाल्याने अनेक ठिकाणी आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले आहेत. या विजयाने राज्यातील जनतेचा कौल पुन्हा एकदा भाजपच्याच बाजूने असल्याचे सिद्ध झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world