अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. शिवाय काही आमदारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतल्याची बाब समोर आली होती.त्यानंतर अजित पवारांना काही आमदार सोडून पुन्हा शरद पवारांकडे जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील दोन तीन महिन्यात निवडणुकीला सामोर जायचे आहे. अशा वेळी ही चर्चा सुरू झाल्यानंतर आता स्वता अजित पवार पुढे आले आहेत. नक्की आमदार जयंत पाटील यांना भेटले का? त्यांना त्यांचे आमदार सोडून जाणार आहेत का? या बाबतचा खुलासाच अजित पवार यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अजित पवार गटाचे काही आमदार बंद दाराआड भेटले. ही बातमी बाहेर आली. जयंत पाटील यांनी ही अशी भेट झाल्याचे नाकारले नाही. रोहीत पवार यांनी तर जाहीर पणे अजित पवारांचे काही आमदार राष्ट्रवादीत येण्यास तयार आहेत असे सांगितले होते. त्यातील काही जणांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात नक्की काय चालले आहे अशी चर्चा सुरू झाली. आता याबाबत अजित पवारांनीच स्पष्टी करण दिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ
जयंत पाटील यांना काही आमदार अधिवेशन काळात भेटले असतील. पाटील यांची भेट घेणे म्हणजे त्यांच्या पक्षात जाणे असा अर्थ होत नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केले. विधान भवनात अनेक आमदार येतात भेटतात. त्याच वेळी ती अनौपचारीक भेट होवू शकते असेही ते म्हणाले. त्यामुळे कोणताही आमदार फुटणार नाही. जे आमदार माझ्या बरोबर आहेत ते कुठेही जाणार नाही. ते सर्व जण माझ्या बरोबरच राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले. काही दिवस आधी विधानभवनात जयंत पाटील यांच्या दालनात अजित पवारांचे काही आमदार त्यांना भेटले होते.