जाहिरात

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोठा राडा, अश्लील शिवीगाळ करत 2 आमदार हाणामारीसाठी धावले

अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मोठा राडा, अश्लील शिवीगाळ करत 2 आमदार हाणामारीसाठी धावले
अकोला:

योगेश शिरसाठ, प्रतिनिधी

अकोल्याहून एक धक्कादायक बातमी आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात जोरदार वाद झाला. दलित वस्तीच्या प्रश्नावर हा वाद झाला. हा वाद इतका टोकाचा होता की त्यानंतर त्यांच्यात प्रचंड अश्लील शिवीगाळ झाली. अधिकारी आणि पालकमंत्र्यांनी दोघांना रोखल्यामुळे यावेळी हाणामारी टळली.

( नक्की वाचा : 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय आहे प्रकरण?

जिल्हा नियोजन समितीची बैठक ही दलित वस्तीचा प्रश्न ठरला वादाचा केंद्रबिंदू ठरला. आज (गुरुवार, 5 जून) पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत अचानक वातावरण चिघळले. दलित वस्तीतील निधीच्या वाटपावरून भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचेआमदार नितीन देशमुख यांच्यात वाद सुरु झाला. हा हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही आमदार एकमेकांच्या दिशेने धावून गेले. 

( नक्की वाचा : Virtual बकरी ईद साजरी करा, नितेश राणेंचा सल्ला, भाजपाच्या नेत्यावरही बरसले )
 

नियोजन भवनातील सभागृहातच हा प्रकार सुरु होता. त्यावेळी उपस्थित असलेले अधिकारी, पालकमंत्री आणि इतर आमदारांनी वेळीच हस्तक्षेप करून दोघांना वेगळं केलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा, शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले असते अशी माहिती, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली. 

राजकारणात विकासाच्या मुद्यावर मतभेद असले तरी त्यावर संयमाने चर्चा करणे अपेक्षित असते. मात्र अकोल्यात या तत्वाला हरताळ फासला गेला. अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या कार्यशैली विषयी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. 

मी काहीही बोललो तरी तिथं अनेक जण पाहणारे होते. बैठक सुरु असताना 2-3 जण ते आमदार नितीश देशमुख यांचे समर्थकही असू शकतात ते शूटिंग करत होते, हे पालकमंत्र्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर जे अपेक्षित नाहीत त्यांनी बैठकीबाहेर थांबावं अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. त्याला नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला, त्या आक्षेपाला मी आक्षेप घेतला. आमच्यात वाद वाढला, अशी माहिती भाजपा आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. आम्ही एकमेकांना शिवीगाळ केली नाही. आम्ही एकमेकांना मोठ्या आवाजात बोललो, असा दावा सावरकर यांनी केला. 

तर आमच्यात तात्विक चर्चा झाली. कोणताही शिवीगाळीचा प्रकार घडला नाही, असं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होतोय, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com