जाहिरात

Virtual बकरी ईद साजरी करा, नितेश राणेंचा सल्ला, भाजपाच्या नेत्यावरही बरसले

मुस्लीम समजानं व्हर्च्युअल बकरी ईद (Bakri Eid) साजरी करावी, असा सल्ला बंदरे आणि मत्स्यविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे.

Virtual बकरी ईद साजरी करा, नितेश राणेंचा सल्ला, भाजपाच्या नेत्यावरही बरसले
Nitesh Rane : नितेश राणे यांनी बकरी ईदबाबत मोठा सल्ला दिला आहे.
सोलापूर:

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

मुस्लीम समजानं व्हर्च्युअल बकरी ईद (Bakri Eid) साजरी करावी, असा सल्ला बंदरे आणि मत्स्यविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते. सोलापूरच्या हिरव्या सापांना गझनीचा रोग झाला आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे मात्र इथल्या काही व्यापाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानात चालणार आमच्या हिंदू राष्ट्रात चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

आमचे सरकार पीडितांबरोबर आहे. त्यांना ताकद देण्यासाठी आहे. फडणवीस सरकार पूर्ण ताकदीने सोलापुरातील हिंदूंबरोबबर आहे, हा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे, असं राणे यांनी सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

स्वपक्षीय नेत्यावरही बरसले

नितेश राणे यांनी फडणवीस आणि गडकरी यांचे संस्कार घ्यावेत, असा सल्ला भाजपा नेते राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिला होता. त्यालाही राणे यांनी उत्तर दिलं आहे. 
 

फडणवीस सरकारमध्ये मी मंत्री आहे मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही. प्यारे खान यांनी मुस्लिम समाजात थोडे मार्गदर्शन केलं पाहिजे, असं राणे यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : राहुल गांधी कुणाच्या वतीनं बोलत आहेत? पाकिस्तानचं नाव घेत श्रीकांत शिंदे यांचा जोरदार हल्ला )

हिंदू धर्मातले सण पर्यावरणपूरक करा म्हणतात, त्यावेळी हिंदू तमाशा करत नाहीत. मात्र मुस्लिम धर्मातील मौला, मौलवी हे बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देणारच असे सांगतात, असं राणे यावेळी म्हणाले.
 

प्यारे खान यांनी मुस्लिम समुदायाला पर्यावरणपूरक बकरी ईद साजरा करण्याचा सल्ला द्यावा. मुस्लिम समुदायाने वर्चुअल पद्धतीने बकरी ईद साजरी करावी यात मला काही वाटत नाही. 

मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी. आम्ही आमच्या हिंदू समाजाबाबत घेतो. मॉरोक्को सारख्या देशात 90 टक्के मुस्लीम आहेत. पण, तेथील मुस्लीम समुदायानं बकरी न कापण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पद्धतीचा भारतीय मुसलमानाने आदर्श घ्यावा, असा सल्लाही राणे यांनी दिला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com