Ambarnath Shivsena Internal Politics : अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याचे समोर आले आहे. पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वालेकर यांनी आमदार बालाजी किनीकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत."आमदार काय करतात,संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात",असं म्हणत वालेकर यांनी किणीकर यांच्यावर निशाणा साधला.
"झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल केली जाते आणि.."
झोपडपट्टी पुनर्वसन आणि हाऊसिंग बोर्डच्या घरांच्या प्रश्नावर बोलताना वालेकर म्हणाले,"2011 च्या जीआरचे दाखले देऊन झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल केली जात आहे.त्यांना भुलचाफा मारताय. नगरसेवक राजू वालेकर यांनी अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न उचलला. होर्डिंग लावणाऱ्यांना पाच कोटीचा दंड लावला गेला. मात्र या अनधिकृत होर्डिंग अजूनही काढले गेले नाहीत. या विषयावर आपला गटनेता काही बोलत नाही.शिवसेनेचे नगरसेवक काही बोलत नाही".
नक्की वाचा >> Mumbai News: दादर रेल्वे स्थानकात सर्वच प्रवाशांना धडकी भरली, ट्रेन सुरु होताच पोलिसांची उडाली धावपळ
अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण
हाऊसिंग बोर्डच्या प्रकल्पाला 15 वर्षे झाली,तरीही नागरिकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत.नागरिकांना भाडा सुद्धा मिळत नाही.पुढच्या पावसाळ्याआधी या नागरिकांना घरे मिळाली पाहिजे,असं झालं तर मी आमदार यांचा सत्कार करणार.परंतु, पंधरा वर्षे झाले लोकांना घर नाही, आमदार नेमकं काम काय करतात?फक्त संध्याकाळी जाऊन फॉर्मवर बसायचं?" अशा शब्दांत वालेकर यांनी टीका केली.यामुळे अंबरनाथच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.दरम्यान,या आरोपांवर आमदार बालाजी किणीकर यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
नक्की वाचा >> Pankaja Munde: "रिटायर्ड व्हावंसं वाटतं..", पंकजा मुंडेंच्या विधानानं खळबळ, बीडच्या परळीत असं का म्हणाल्या?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world