Amravati news: 'मागासवर्गीय असल्याने माझ्या अधिकारांचं हनन', काँग्रेस खासदारांचा लेटरबॉम्ब

त्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने बच्चू कडू यांची बाजू एनडीटीव्ही मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
Read Time: 3 mins
अमरावती:

शुभम बायस्कार

मागासवर्गीय असल्याने माझ्या अधिकारांचे हनन करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप अमरावती लोकसभेचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे.  प्रहारचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर त्यांनी हा आरोप केला आहे. वानखडे यांनी कडूविरोधात थेट महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांची एकहाती सत्ता होती. दोन वर्षांपूर्वी विरोधी गटातील संचालकांना फोडत अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू अध्यक्ष झाले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक अशा कुरघोडीचे राजकारण सहकार क्षेत्रात पाहायला मिळालं. त्यातच आता अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे प्रहारचे प्रमुख बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक आणि बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत प्रवीण ढेपे यांची तक्रार केली आहे. बळवंत वानखडे यांनी दिलेली ही तक्रार अतिशय गोपनीय आहे. माध्यमांमध्ये अजूनही या तक्रारींचा कुठेही उहापोह झालेला नाही. या तक्रारीत त्यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कसा अनागोंदी कारभार सुरू आहे, यावरून ताशेरे ओढले आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Plane crash:विमान अपघात रोखण्यासाठी पक्षांची दिशा सरकार बदलणार? पण कशी?

अमरावती जिल्हा बँकेच्या अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून मी निवडून आलो आहे असं खासदार वानखेडे यांनी पत्रात म्हटलं आहे. मी बँकेचा विद्यमान संचालक आहे. बँकेच्या कामकाजात संचालक म्हणून सहभागी होण्याचे मला अधिकार असतानाही अध्यक्ष, उपाध्यक्ष मला स्वाक्षरी करू देत नाहीत. मागासवर्गीय असल्याने माझ्या अधिकाराचं हनन केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने बच्चू कडू यांची बाजू एनडीटीव्ही मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बच्चू कडूंनी वानखडे यांच्या तक्रारीवर उत्तर देण टाळलं. "त्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपण माहिती देणार'' असं म्हणत त्यांनी मूळ विषयाला बगल दिली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pandharpur Wari 2025: संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं नीरा स्नान, वारकऱ्यांची तुडूंब गर्दी

तर राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनाही एनडीटीव्ही मराठीने संपर्क करून वानखडे यांच्या तक्रारीवर काय कारवाई झाली याची विचारणा केली. त्यावर मेश्राम यांनी या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे म्हटलं आहे. मात्र ठोस कारवाई झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयोगही वानखडे यांच्या तक्रारीला घेऊन किती गंभीर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायदा डावलून बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी समित्या स्थापन केल्या. मी मागासवर्गीय संचालक असल्याने मला कुठल्याही समितीवर घेण्यात आलं नाही असा आरोपही वानखेडे यांचा आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सात सहकारी संचालक यांनी खोटे प्रोसेडिंग लिहून करोडो रुपयांचा गैर व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दहा-बारा वर्षापासून नफ्यात असलेली बँक, भ्रष्टाचारामुळे तोट्यात आली आहे, निबंधक कार्यालयाची दखल घेत नाही असं ही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

Advertisement