मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी जाहीर केले की ते यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नाही. जरांगे यांनी 3 नोव्हेंबर रोजी काही मतदारसंगात आपण उमेदवार उभे करणार असून काही मतदारसंघात उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. काही मतदारसंघात उभे असलेले उमेदवार पाडण्याचीही घोषणा केली होती. जरांगे यांनी खालील मतदारसंघात आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता.
नक्की वाचा: "मनोज जरांगेंचा निर्णय आमच्यासाठी योग्य", शरद पवारांनी उलगडून सांगितलं
- केज
- परतूर
- फुलंब्री
- बीड
- हदगाव
- धाराशिव(उस्मानाबाद)
- दौंड
- पर्वती
पाथर्डी, शेवगाव ,करमाळा, वसमत, हिंगोली, कन्नड, पाथरी, गंगाखेड, लोहा, कंधार, तुळजापूर, भूम-परांडा, कोपरगाव, नेवासा, पाचोरा, माढा, धुळे, निफाड आणि नांदगावसंदर्भात रात्री उशिरापर्यंत जरांगे आणि त्यांच्या साथीदार चर्चा करत होते. सोमवारी जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद बोलावली ज्यामध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय आपण मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. एका जातीच्या आधारे आपण निवडणूक जिंकू शकत नाही असेही जरांगे यांनी म्हटले होते.
नक्की वाचा : विधानसभा लढवण्यावर ठाम होते, जरांगे पाटलांनी अचानक निर्णय का बदलला? निवडणुकीतून का घेतली माघार?
यादी आलीच नाही
जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की त्यांना साथ देणाऱ्यांनी त्यांची यादी दिलीच नाही. पहाटे तीनवाजेपर्यंत ही यादी आली नव्हती असे जरांगे यांनी म्हटले होते. जरांगे यांनी धर्मगुरुंसोबत एक बैठक बोलावली होती. या बैठकीला मुस्लिम, बौद्ध धर्माचे आणि महानुभाव पंथाचे धर्मगुरू उपस्थित होते. जरांगे यांनी मुस्लिम आणि दलित उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. जरांगेंसोबत उभ्या राहीलेल्यांकडून त्यांच्या उमेदवारांची एक यादी मिळणे अपेक्षित होते. मात्र ही यादी पहाटेपर्यंत मिळाली नव्हती असे जरांगे यांनी सांगितले.
यादी वेळेवर दिली
NDTV मराठी डिजिटलवर आयोजित एका चर्चासत्रामध्ये आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर आणि अन्झार खान सहभागी झाले होते. मराठा समाजाचे राजेंद्र कोंढरे, आबासाहेब पाटील हे देखील या चर्चेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमात राहुल कुलकर्णी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर यांनी आपण जरांगेंना यादी वेळेत दिली होती असा खुलासा केला. राजरत्न यांनी त्यांनी किती जागांवर लढायचं ठरवलं होतं, याचा आकडाही जाहीर केला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा या दोघांनी यादीसंदर्भातील जरांगे यांचा दावा खोडून काढला. राजरत्न आंबेडकर यांनी याच कार्यक्रमात बोलताना म्हटले की जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या प्लॅनमध्ये कोणीतरी आडकाठी आणली. ही आडकाठी कोणी आणली हे नाव आमच्यासकट सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे असेही त्यांनी म्हटले. अन्झार खान यांनीही आंबेडकरद्वयींनी केलेल्या दाव्याला पूरक भूमिका घेत आम्हीही जरांगे यांना 4-5 नावे दिली होती असे सांगितले. अन्झार यांच्या प्रयत्नांमुळे मुस्लिम धर्मगुरू सज्जाज नोमानी आणि जरांगे पाटील यांची भेट झाली होती.