जाहिरात

दिलासा की धक्का? केजरीवाल तुरूंगातून सुटले पण 'या' गोष्टींत अडकले

केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. पण जामीन देताना काही अटी टाकत केजरीवाल यांना कोर्टाने धक्काही दिला आहे.

दिलासा की धक्का? केजरीवाल तुरूंगातून सुटले पण 'या' गोष्टींत अडकले
नवी दिल्ली:

मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. पण जामीन देताना काही अटी टाकत केजरीवाल यांना कोर्टाने धक्काही दिला आहे. त्यामुळे एकाच वेळी दिलासा आणि धक्का अशा गोष्टी पाहायला मिळत आहे. हा जामीन त्यांना काही अटीशर्तींसह देण्यात आला आहे. शिवाय त्यांना दहा दहा लाखाचा जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल यांना जामीन मिळवून देण्यात त्यांचे वकील अभिषेक मनू संघवी यांची मोठी भूमिका राहीली आहे. त्यांनी केलेल्या युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. शेवटी केजरीवाल यांना पाच महिन्यानंतर जेल बाहेर येण्याचा केजरीवाल यांचा मार्ग मोकळा झाला.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केजरीवाल यांना जामीन मिळाला असला तरी काही अटी आणि शर्तींमध्ये ते अडकले आहेत. जामीन देताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. त्यात अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही. शिवाय सचिवालयातही ते जाऊ शकणार नाहीत. आवश्यक असल्याशिवाय कोणत्याही सरकारी फाइलवर स्वाक्षरी ही त्यांना करता येणार नाही. शिवाय  या खटल्याबाबत कोणतेही सार्वजनिक विधान किंवा टिप्पणी करता येणार नाही. कोणत्याही साक्षीदाराशी कोणत्याही प्रकारे बोलता येणार नाही. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाइलमध्ये हस्तक्षेप नसेल. गरज भासल्यास ट्रायल कोर्टात हजर राहून तपासात सहकार्य करावं लागेल. या अटी आणि शर्ती कोर्टाने घातल्या आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन

केजरीवाल यांना जामीन मिळावा यासाठी अभिषेक मनू संघवी यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्यांनी सीबीआच्या कामा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. केजरीवाल यांच्या विरोधात दोन वर्षापूर्वी सीबीआयने तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्यांना अटक केली नाही. ज्यावेळी ईडीच्या केसमध्ये केजरीवाल यांना जामीन मिळाला त्यानंतर सीबीआयला जाग आली असे संघवी म्हणाले. त्यांचा हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला. सीबीआयने ऐवढे दिवस काय करत होती असा प्रश्न कोर्टानेही केला. त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. 

ट्रेंडिंग बातमी - 'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?

मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सुरूवातीला ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची रवानगी तरूंगात झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांना तात्पूरता जामीन मिळाला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा सरेंडर व्हायचे होते. जवळपास पाच महिन्याच्या कालावधीनंतर ते आता जेलच्या बाहेर येणार आहेत. या प्रकरणात आप मधील नेत्यांना एका मागून एक जामीन मिळत आहे. आता केजरीवाल बाहेर आल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Switch To Dark/Light Mode
Previous Article
पंढरपुरात उमेदवारीवरुन पेच; भगीरथ भालकेच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं
दिलासा की धक्का? केजरीवाल तुरूंगातून सुटले पण 'या' गोष्टींत अडकले
jitendra-awhad-responds-to-ajit-pawar-comeback-in-ncp-sharad-pawar
Next Article
अजित पवारांना पुन्हा पक्षात घेणार का? आव्हाडांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...