विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. कोरोना काळात वीज दरवाढी विरोधात भाजपने आंदोलन केले होते. त्यावेळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण झाल्याची घटना होती. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह 20 पदाधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाची सुनावणी सध्या सत्र न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीला राहुल नार्वेकर हजर राहीले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या न्यायाधिशांनी नार्वेकर यांना 3 हजाराचा दंड ठोठावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोरोना काळात कुलाबा पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपच्या एकूण 20 पदाधिकार्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या समोर सुरु आहे. या प्रकरणात जे साक्षीदार आहेत त्यांची उलटतपासणी सुरू आहे. शिवाय हा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्याला राहुल नार्वेकरांनी उपस्थित राहणे गरजेचे होते.
ट्रेंडिंग बातमी - 'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?
पण राहुल नार्वेकर हे विशेष सत्र न्यायालयात गैरहजर राहिले.याबाबत न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली. केवळ नाराजीच नाही तर संतप्त होत त्यांनी राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ही केला. ही रक्कम तातडीने कोर्टात जमा करण्याचे आदेशही यावेळी दिले. आता या प्रकरणाची चौकशी 8 जुलैला होणार आहे. यावेळी राहुल नार्वेकर यांनी सुनावणीला हजर रहावे अशी ताकीद देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world