BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने युती करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमधील जागावाटप 29 डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकलं नव्हतं. मुंबईसह राज्यात 29 महापालिकांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 23 डिसेंबर रोजी सुरू झाली होती आणि यासाठीची अखेरची तारीख 30 डिसेंबर 2025 ही असणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची तारीख जवळ आली तरी युतीची अधिकृत घोषणा आणि जागावाटप करण्यात आलेले नव्हते. अशात भाजपने 29 डिसेंबर रोजी आपली पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीमध्ये 68 जणांच्या नावांचा समावेश आहे.
नक्की वाचा: BMC Election 2026 BJP Candidate List: भाजपची पहिली यादी जाहीर, कोणा-कोणाला मिळाली उमेदवारी?
2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार
मुंबईसह सगळ्या 29 महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
37 महिलांना भाजपने दिली उमेदवारी (How many women candidates are there in BJP's list for BMC Election 2026?)
भाजपने 29 डिसेंबर 2025 रोजी 68 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 31 पुरूष उमेदवारांचा तर 37 महिला उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना (उबाठा) माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने तेजस्वी यांना वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नील सोमय्या हे यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नगरसवेक म्हणून निवडून आले होते.
नक्की वाचा: मुंबईसह 29 मनपांच्या निवडणुका कधी? EVM, ओळखपत्र,मतदार यादीसह 35 प्रश्नांची उत्तरं वाचा
भाजपने उमेदवारी दिलेले अमराठी उमेदवार
वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी
वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह
वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा
वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल
वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव
वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा
वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा
वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना
वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले
वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल
वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड
वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह
वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी
वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव
वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला
वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या
वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा
वॉर्ड क्रमांक - १७४ - साक्षी कनोजिया
वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा
वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित
भाजपने उमेदवारी दिलेले मराठी उमेदवार
वॉर्ड क्रमांक - २ - तेजस्वी घोसाळकर
वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर
वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल
वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे
वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर
वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे
वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर
वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे
वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे
वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी
वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम
वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर
वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी
वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर
वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक
वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे
वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत
वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे
वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर
वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत
वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे
वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर
वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे
वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती
वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे
वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग
वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार
वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील
वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव
वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत
वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते
वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन
वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ
वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे
वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण
वॉर्ड क्रमांक - १७२ - राजश्री शिरोडकर
वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई
वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत
वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे
वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील
वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले
वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर
वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप
वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर
वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world