जाहिरात

Bachchu Kadu: 'देवभाऊंचा मार्ग बंद केला, आता रेल्वे बंद पाडू!' बच्चू कडूंच्या आंदोलनाने नागपुरात अलर्ट

Bachchu Kadu Protest: शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांग व्यक्तींच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी 'शेतकरी, शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन' करणारे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे.

Bachchu Kadu: 'देवभाऊंचा मार्ग बंद केला, आता रेल्वे बंद पाडू!' बच्चू कडूंच्या आंदोलनाने नागपुरात अलर्ट
Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी नागपुरमध्ये आंदोलन सुरु केलं आहे.
नागपूर:

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी 

Bachchu Kadu Protest: शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांग व्यक्तींच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी 'शेतकरी, शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन' करणारे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे. कडू यांनी  उद्या म्हणजेच बुधवारी (29 ऑक्टोबर 2025) नागपूरची रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरातील शासकीय निवासस्थान 'रामगिरी' येथे भेट घेणे शक्य नसल्यामुळे, आता गवसी मानापूर येथेच ठिय्या मांडून आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.

"जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत आणि यासंदर्भात आदेश निघत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. उद्यापर्यंत (बुधवारपर्यंत) निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वे बंद पाडू," असा स्पष्ट इशारा बच्चू कडू यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना दिला आहे.

प्रमुख मागण्यांवर बच्चू कडू आक्रमक

आमदार बच्चू कडू यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र करत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी "देवभाऊंच्या (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) शासकीय निवासस्थानाचा जाण्याचा मार्ग आम्ही बंद केला आहे आणि उद्या रेल्वेही बंद करणार आहोत," असा इशारा दिला. 

( नक्की वाचा : RSS Diwali Message: संघ स्वयंसेवक दिवाळी शुभेच्छा देताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख का करत आहेत? जाणून घ्या अर्थ )

"आम्ही गेल्या 8 महिन्यांपासून किमान 15 वेळा निवेदन दिले आहे, पण सरकारला दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. आता म्हणतात बैठक लावली, हे कसे शक्य आहे? आता त्यांनी निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही, " असं कडू यांनी सांगितलं. 

''नागपूर शहर जाम झाले असले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नागरिकांनी एवढी कळ (त्रास) सोसली पाहिजे. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही, पण आमचं आयुष्य जाम झालं त्याचं काय?"
प्रशासनाने दिलेली जागा आम्हाला मान्य नाही, आम्ही इथेच थांबणार आहोत. आता रस्त्यावरच आमचं सगळं आयुष्य आहे असं त्यांनी सांगितलं. हे आंदोलन पंजाबच्या धर्तीवर होईल आणि त्यासाठी वर्षभर इथेच बसायची आमची तयारी आहे, असंही कडू म्हणाले.

( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : फोटोवरून वाद, शेवटचा कॉल... डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती उघड )

नागपुरात आंदोलन का?

बच्चू कडू यांनी आपले आंदोलन नागपूर शहरात करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,  "सगळी आंदोलनं मुंबईत होतात, पण इथे आमचे देवेंद्र फडणवीस (देवभाऊ) आणि नितीन गडकरी (नितीन भाऊ) राहतात. संपूर्ण भारत देश नागपुरातून चालतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय इथे आहे. भाजपला जर कदर आली नाही, तर संघाला तरी कदर येईल."

वाहतूक कोंडी करण्यासाठी ट्रॅक्टर!

बच्चू कडू यांनी आंदोलनाबाबत अद्याप सरकारमधील कोणाचाही फोन आला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, "फोन येऊन काय उपयोग नाही, जोपर्यंत यासंदर्भात ठोस आदेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन कायम राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

'शेतकरी, शेतमजूर हक्कयात्रा आंदोलना'साठी पोलिसांनी केवळ 1 दिवसाची परवानगी दिली आहे. तरीही, कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाप्रमाणेच हा 'ट्रॅक्टर एल्गार महामोर्चा' रेंगाळण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. काही कार्यकर्त्यांनी नागपूर-वर्धा महामार्गावरील वाहतुकीची कोंडी (Traffic Congestion) करण्यासाठीच ट्रॅक्टर आणले जात असल्याचे उघडपणे सांगितले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com