'बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत'

बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत आहेत असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

बदलापूर प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचे विरोधक राजकारण कर आहेत. शिवाय तिथे झालेले आंदोलन हे राजकीय दृष्टीने प्रेरीत होते. हे विकृत मानसिकतेचे लक्ष आहे अशी टिका  विरोधकांवर केली आहे. याचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. बदलापुरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत आहेत असा हल्लाबोलच ठाकरे यांनी केला. एखाद्या घटनेचा  निषेध करणाऱ्यांना तुम्ही विकृत म्हणत असाल तर निषेधही करायचा नाही का? असा सवालही ठाकरे यांनी केला. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही शाब्दीक फटकारे लगावले.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'...तर मुख्यमंत्री विकृत' 

बदलापूर एकीकडे पेटलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करत होते. त्यांनी त्यावेळी बदलापुरला जाणे गरजेचे होते. पण मुख्यमंत्री रत्नागिरीत मिरवत होते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत होता. अशा वेळी मुख्यमंत्र्यांना काही वटत नव्हतं. वर ते जे निषेध करत आहेत त्यांना विकृत म्हणत होते. जनतेच्या मनातला तो उद्रेक होता हे मुख्यमंत्र्यांना समजलं नाही. उलट विरोधकांनाच दोषी ठरवायचं हे निर्लज्ज पण आहे असही ठाकरे म्हणाले. ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना रत्नागिरीत अकेलची दिवाळखोरीच दाखवली असा टोलाही या निमित्ताने ठाकरे यांनी लगावला.  

ट्रेंडिंग बातमी - बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील शाळांना चाप, सरकारकडून 6 महत्त्वाचे आदेश जारी 

' तुम्ही नराधमाच्या पाठिशी आहात का?'

गुन्हा झाल्यानंतर पिडीताच्या आईला ताटकळत पोलीस स्थानकात उभं करण्यात आलं होतं. ती गर्भवती होती. पोलीसांनी तक्रार घेण्यास उशीर केला. पोलीसांवर कोणाचा दबाव होता हे समजले पाहीजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा आरएसएस, भाजपच्या संबधित शाळा आहे. त्यातून कोणी दबाव टाकला का असा प्रश्न ठाकरे यांनी केला आहे. हे सरकार नराधमाचं सरकार आहे का? झालेली घटना मुख्यमंत्र्यांना मान्य आहे का? असा खडा सवाल ही त्यांनी केला आहे. ठाकरेंना यावेळी शिंदेंना थेट लक्ष्य केले आहे. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.  

ट्रेंडिंग बातमी - शाळेविरोधात कारवाई नाही, दुसऱ्या पीडितेचं स्टेटमेंट नाही; बदलापूर प्रकरणात कोर्टाने सरकारला खडसावलं!

'गृहमंत्री जबाबदारीच घेत नाहीत' 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्क्रीय आहेत. ते कोणत्याही गोष्टीची जबाबदारी घेत नाहीत असा थेट आरोप या निमित्ताने ठाकरे यांनी केला. अभिषेक घोसळकरांची हत्या झाली त्यावेळी ही त्यांचे वर्तन तसेच होते असेही ठाकरे म्हणाले. गृहमंत्री जबाबदारी घेत नाही. क्षमता नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री आहे. फक्त ढोल पिटणे हेच त्यांना काम आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्त कोण आहेत. त्यांनी या प्रकरणी बोललं पाहीजे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची सुरक्षा वाढवली; केंद्राकडून मिळाली झेड प्लस सुरक्षा, पण कारण काय?

'बंद राजकीय नाही, सर्वांना सहभागी व्हा'

24 तारखेला बदलापूर प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद राजकीय स्वरूपाचा नाही असे ठाकरे म्हणाले. सर्वांनी या बंदमध्ये स्वत: हून सहभागी व्हावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. महाराष्ट्र जागृत आहे हे दाखवण्यासाठी हा बंद असल्याचे ते म्हणाले. सुरक्षित बहीण हिच आमची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जातपात धर्म पक्ष बाजूला ठेवून या बंदमध्ये सहभागी व्हा असे ठाकरे म्हणाले.  दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निट वागावे. सत्ता गेल्यानंतर याच ठाण्यात तुम्हाला राहायचे आहे असेही ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावले आहे.   

Advertisement