बंद दाराआड चर्चा समोर आली, दादा- फडणवीसांत काय ठरलं? पाटलांनी सर्वचं सांगितलं

अजित पवारांनी लोकसभा निवडणुकी वेळी बंद दाराआड काय शब्द दिला होता याचा तपशीलच हर्षवर्धन पाटील यांनी उघड केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

विधानसभेतील हॉट सीट पैकी एक सीट ही पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची आहे. या मतदार संघात सध्या अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. अजित पवार हे महायुतीत आहेत. तर याच मतदार संघातून हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून इच्छुक आहेत. ज्याचा विद्यमान आमदार त्याची ती जागा असे सुत्र ठरले आहे. असं असलं तरी हे सुत्र इंदापूरसाठी लागू होणार की नाही याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकी वेळी बंद दाराआड काय शब्द दिला होता याचा तपशीलच हर्षवर्धन पाटील यांनी उघड केला आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभेचे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. त्याला आत अजित पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवारांना मदत केली. त्या बदल्यात इंदापूर विधानसभेची मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी आपल्याला शब्द देण्यात आला होता असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. त्यावेळी अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या बैठकीतच अजित पवारांनी शब्द दिला आहे असं ते म्हणाले.     

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  '...तर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 3 हजार रुपये देऊ'
 

अजित पवार यांनी कबूल केल आहे की, इंदापूर  विधानसभेचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो मला मान्य असेल. त्याला त्यांचा पाठिंबा असेल असं पाटील म्हणाले. "लोकसभेवेळी देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि माझ्यात चर्चा झाली होती. अजित पवार यांनी त्यावेळी कबूल केल आहे की, इंदापूर  विधानसभेचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो मला मान्य असेल. त्याला माझा पाठिंबा असेल. असा शब्द अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांना दिला होता, असा दावाच हर्षवर्धन पाटील यांनी केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'नाईलाजाने गेली अडीच वर्षे अजित पवारां सोबत' आणखी एक आमदार दादांची साथ सोडणार?

शिवाय नंतर झालेल्या प्रचारसभांच्या भाषणात अजितदादांनी हेच म्हटलं होतं. त्यासह फडणवीसांनी इंदापूर आणि मुंबईत तेच सांगितलं होतं. पण, अजून महायुतीच्या जागावाटपाची चर्चा होत आहे. इंदापूरची जागा कोणत्या पक्षाला जाते, यावर अजून बरीच चर्चा बाकी आहे. जे ठरलं होतं, त्यानुसार आमचे नेते निर्णय घेतील," असं म्हणत एकप्रकारचे हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरची जागा भाजपला मिळणार असल्याचा विश्वास  व्यक्त केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर अजित पवार गटाकडून आता कोणतही प्रतिक्रीया येते ते पहावे लागणार आहे. 

Advertisement