जाहिरात

Bihar Election: जागा वाटप जाहीर! नितीशकुमार गेल्या वेळ पेक्षा कमी जागांवर लढणार, भाजप, लोजपला किती जागा?

मागिल विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या एलजेपीने स्वबळावर निवडणूक लढवली होती.

Bihar Election: जागा वाटप जाहीर! नितीशकुमार गेल्या वेळ पेक्षा कमी जागांवर लढणार, भाजप, लोजपला किती जागा?

NDA Seat Sharing in Bihar: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचे जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. विधानसभेच्या 243  जागा आहे. त्याची वाटप आज जाहीर करण्यात आले.  त्यानुसार भाजप 101 जागांवर लढणार आहे. तर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड ही 101 जागांवर निवडणू लढेल. एनडीएमधील या दोन्ही मोठ्या पक्षांनी समसमान जागा स्वत:च्या पदरात पाडून घेतल्या आहेत. तर लोक जनशक्ती पार्टीला 29 जागा मिळाल्या आहेत. मित्रपक्ष असलेल्या आरएलएम सहा जागावर तर जितमराम मांझी यांच्या एचएएमला ही सहा जागा देण्यात आल्या आहेत. 

जागा वाटपात भाजप आणि जेडीयूला समान जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत कोणी छोटा किंवा मोठा भाऊ नाही. मागील वेळेस झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांची जेडीयू 115 जागांवर निवडणूक लढली होती. तर त्याच वेळी भाजप 110  जागांवर लढली होती. यावेळी भाजप 9 जागा कमी लढवणार आहे. तर जेडीयू जवळपास 14 जागा कमी लढवणार आहे. या दोघांच्या वाट्याच्या जागा मित्र पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. 

नक्की वाचा - Ladaki bahin Yojana: आता 'या' संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध, दिवाळीचा हाफ्ता कधी जमा होणार?

मागिल विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या एलजेपीने स्वबळावर निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र त्यांची एनडीएमध्ये एन्ट्री झाली आहे. चिराग यांनी सुरूवाती पासूनच 40 जागा मिळाव्यात असा आग्रह धरला होता. त्यांनी जास्तीत जास्त जागांसाठी एनडीएच्या नेत्यांवर दबाव टाकला होता. त्याचा फायदा त्यांना जागा वाटपात झालेला दिसतो. पासवान यांच्या पदरात जवळपास 29 जागा पडल्या आहेत. आरएलएमला सहा जागा दिल्या गेल्या. मागील वेळेस आरएलएम वेगळी लढली होती. 

नक्की वाचा - Pune News: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रॅगिंग? कॅडेटसोबत भयंकर घडलं

जितनराम मांझी यांच्या हम पक्षानेही तीस जागा मिळाव्यात असा आग्रह धरला होता. तेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूकच लढणार नाही अशी थेट भूमीका त्यांनी घेतली होती. मांझी हे केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी शेवटी तडजोड करत सहा जागांवर समाधान मानले आहे. त्यांचा पक्ष आता बिहार विधानसभेच्या  सहा जागा लढणार आहे.बिहारमध्ये इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए असा सामना होणार आहे. शिवाय प्रशांत किशोर यांचा पक्ष ही मैदानात आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com