शिंदेंच्या नेत्याची काँग्रेसला मदत? आता भाजपनेत्याने दंड थोपटले, वाद पेटणार?

नंदूरबार लोकसभा मतदार संघात हिना गावित यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन विजयानंतर हॅटट्रीक करण्याचे हिना गावित यांचे स्वप्न भंग पावले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नंदूरबार:

लोकसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. त्यानंतर भाजपकडून आत्मचिंतन केले जात आहे. पराभूत उमेदवारही पराभवाची कारणे शोधत आहेत. नंदूरबार लोकसभा मतदार संघ हा तसा पूर्वी पासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्ल्याला भाजपच्या हिना गावीत यांनी सुरूंग लावला. सलग दोन वेळा त्यांनी विजय नोंदवला. पण त्यांची हॅटट्रीक हुकली. याला त्यांना आता थेट शिंदे गटाच्या नेत्याला जाबाबदार धरलं आहे. ऐवढचं नाही तर या नेत्याला आमदार होण्यापासून रोखावं अशी तक्रारच त्यांनी भाजपच्या श्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे नंदूरबारमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना शिंदे यांच्या वाद होण्याची दाट शक्यत आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

नंदूरबार लोकसभा मतदार संघात हिना गावित यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन विजयानंतर हॅटट्रीक करण्याचे हिना गावित यांचे स्वप्न भंग पावले. हा भाजपसाठी मोठा धक्का होता. पण मंत्री आणि त्यांचे वडील विजयकुमार गावित यांच्या वर्चस्वालाही हा धक्का होता. या पराभवाची कारणे आता शोधली जात आहेत. हा पराभव शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामुळे झाल्याचा आरोप हिना गावित यांनी केला आहे. रघुवंशी यांनी महायुतीचे काम केले नाही. त्यांनी महायुतीच्या विरोधात काम करताना काँग्रेसची साथ दिली असाही त्यांचा आरोप आहे. शिवाय याबाबतची तक्रार आपण पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय रघुवंशी यांना विधान परिषदेवर घेतले जाणार आहे. मात्र त्यांना आमदार होण्यापासून रोखावे. त्यांच्या ऐवजी प्रामाणिक शिवसैनिकाला विधान परिषदेत पाठवावे अशी मागणीही गावित यांनी केली आहे.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदार संघात भाजपला पराभव सहन करावा लागला. त्या पैकीच एक नंदूरबार लोकसभेतील पराभव आहे. या मतदार संघातून काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा मोठा पराभव केला. शिवाय काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या मतदार संघ परत आपल्याकडे खेचून आणला. हा पराभव भाजप आणि हिना गावित यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच आता गावित या आक्रमक झाल्या आहेत. जे या पराभवाला जाबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर नंदूरबारमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना वाद रंगण्याची दाट शक्यता आहे. 
 

Advertisement