महायुतीत वाद पेटला! शिंदेंच्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणीच भाजपच्या नेत्याने केली आहे. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना लिहीले आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
जालना:

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. राज्यात महायुतीला अपेक्षीत यश मिळाले नाही. तर महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपल्यापरिने निकालाचा अर्थ लावत आहे. शिवाय चिंतनही केले जात आहे. कुठे दगाफटका झाला, कुठे कोणत्या गोष्टी चुकल्या याचे विश्लेषण केले जात आहे. मात्र यातून महाविकास आघाडीत वाद होताना दिसत आहेत. आता महायुतीतील राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणीच भाजपच्या नेत्याने केली आहे. तसे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना लिहीले आहे. या पत्रातून संबधित मंत्र्यावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जालना लोकसभा मतदार संघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा फटका बसला. सलग पाच वेळा रावसाहेब दानवे यांनी यामतदार संघातून विजय मिळवला होता. यावेळी मात्र त्यांना विजयाने चकवा दिली. तर 1996 नंतर काँग्रेसने जालन्यावर विजय मिळवला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. दानवे यांच्या पराभवनंतर महायुतीचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. माझ्या कार्यकर्त्यांनी दावने यांच्या विरोधात काम केले असे जाहीर पणे सांगितले. दानेव यांनी माझ्यावर सतत अन्याय केल्याचेही सत्तार यांनी बोलून दाखवले. त्यामुळे कार्यकरते हे नाराज होते. शिवाय काँग्रेस उमेदवार कल्याण काळे हे आपले जुने सहकारी होते. विजयानंतर काळेंनी सत्तार यांची भेट घेतली होती. त्यामुळे आगीत आणखी तेल टाकले गेले. 

Advertisement

हेही वाचा - 'मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही...' रोहित पवारांचा अजितदादांना टोला

  सत्तार यांनी घेतलेल्या या भूमीकेचा सिल्लोड भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी निषेध केला आहे. शिवाय त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांना एक पत्रही लिहीले आहे. या पत्रात कटारिया यांनी गंभीर आरोप केले आहेत.  लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांनी केला. अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. सिल्लोडमधील भाजप संपवण्यासाठी अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न आहे. त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांची तातडीने राज्य मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. 

हेही वाचा -  'भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ; विधानसभेपूर्वी प्रकाश आंबेडकरांची 'आम्ही परत येऊ'ची घोषणा 

अब्दुल सत्तार यांनी वारंवार भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. यावेळीही त्यांनी तेच केले. त्यांच्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळाले. त्यामुळेच लोकनेते रावसाहेब दानवे यांना पराभव स्विकारावा लागला असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सत्तार यांनी विरोधात काम केल्याने भाजप कार्यकर्त्यांच प्रचंड नाराजी आहे. अनेक वेळा पक्ष हितासाठी कार्यकर्ते शांत राहीले होते. मात्र आता त्यांना होणारा त्रास सहन होत नाही. त्यामुळे सत्तार यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या मागणीनंतर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रीय येते हे पाहावे लागले.    

Advertisement

Advertisement