
भाजप नेते किरीट सोमय्या हे सध्या पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातय. त्यांनी आपल्या या भावना पहिल्यांदाच सर्वां समोर मांडल्या आहेत. सोमय्या यांची विधानसभा निवडणूक प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या यांनी हे सदस्य पद स्वीकारण्यास नकार दिला. शिवाय मला न विचारता नावाची घोषणा केली ही पद्धत चुकीची असून मला ही मान्य नाही. मला पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये अशा शब्दात पक्षाच्या नेत्यांना सुनावलं होतं. मात्र सोमय्या हे का नाराज आहेत? त्यांच्या मनात कोणती सल आहे? याबाबच आता सोमय्या यांनी पहिल्यांदाच सांगितले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेला किरीट सोमय्याही आले होते. पहील्या रांगेत ते बसलेही होते. मात्र त्यानंतर ते तिथून निघून गेले. त्याबाबत सोमय्या सांगतात, पाच वर्षा पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मला तिथून जायला सांगितले होते. तेव्हा पासून आज पर्यंत पक्षाचे कोणतेही पद घेतले नाही. पदाशिवाय आपण काम करत आहोत. पक्षाचे काम करण्यासाठी कोणते पद असलेच पाहीजे असे काही नाही. एक सामान्य सदस्य म्हणून आपण काम करत आहे. त्यामुळे असल्या कमिट्यांमध्ये सदस्य बनवण्यात आपल्याला रस नाही. असे सांगत सोमय्या यांनी एक पत्रकार त्या पत्रकार परिषदेतून आपल्याला बाहेर काढणं जिव्हारी लागल्याचेच सांगितले आहे. याची वाच्यता त्यांनी गेल्या पाच वर्षात कुठेही केली नाही. मात्र संधी मिळताच त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली आहे.
पक्षात एखाद्या विषयावर वेगवेगळी मते असू शकतात. कोणतेही पद न घेता जास्त काम करत असल्याचे यावेळी सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकारच्या काळात अनेक घोटाळे बाहेर काढले. ठाकरेंचे सरकार घालवले. तीन वेळा आपल्यावर जीव घेणा हल्ला झाला. पण आपण डगमगलो नाही. त्यावेळीही आपल्याकडे कोणतेही पद नव्हते. एक सामान्य कार्यकर्ता काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं आहे असेही सोमय्या म्हणाले. आपल्यासाठी पक्ष आणि देश महत्वाचा आहे. त्या समितीमध्ये न राहाताही आपल्याला काम करायचे आहे. पक्षाचे काम आपण करतच राहाणार आहे. पण त्या पत्रकार परिषदेत झालेला अपमान सोमय्या यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शेवटी त्यांनी ती गोष्ट बोलून दाखवली. शिवाय आपल्याला कोणत्याही पदाची गरज नाही असे त्यांनी पक्षश्रेष्ठींनाच सांगून टाकले.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
लोकसभा निवडणुकीतही ठाकरेंमुळे सोमय्या यांची उमेदवारी कापण्यात आली होती. शिवाय त्यांच्या आग्रहामुळेच त्या पत्रकार परिषदेतूनही सोमय्या यांना जावे लागले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही सोमय्या यांना उमेदवारी पक्षाने दिली नाही. त्यामुळेही सोमय्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांची तिच खदखद अखेर बाहेर आली. शिवाय आपण जे काम करत आहे ते पाहाता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल असा विश्वासही त्यांनी उपस्थित केला. सोमय्या हे पक्षात एकटे पडल्याचे चित्र आहे. मात्र हे चित्र माध्यमांनी उभं केलं असल्याचे ते म्हणाले. आपण राजकारणापासून कुठेही दुर गेलेलो नाही. काम करतच राहाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार? दोन अग्रवाल एकमेकांना भिडणार?
सोमय्या यांनी जे पत्र लिहीलं होतं त्यात ते म्हणतात,"मला प्रचार समितीचा सदस्य म्हणून नियुक्त केल्याबद्दल आभार मानतो आणि या समितीत काम करण्यास असमर्थता व्यक्त करतो. गेली साडे पाच वर्ष, म्हणजे 18 फेब्रुवारी 2019 पासून, मी भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे, मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. 3 वेळा माझ्यावर जीवघेणे हल्लेही झाले. मी आपल्या ह्या निवडणूक व्यवस्थापन आणि प्रचार समितीमध्ये सामील होऊ शकत नाही. सामान्य सदस्य म्हणून आयुष्यभर पक्षाचे काम करणार", असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world