विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्ष बदलताना दिसत आहे. इच्छुकही परिस्थिती नुसार निर्णय घेत पक्षांतर करत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यातील एक हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित हे आहेत. तर दुसरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी हे आहे. या दोघांनी ही विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. हे दोघेही शहादा-तळोदा मतदार संघातून काँग्रेसकडून इच्छुक आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. ते शहादा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी ही मागितली आहे. राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेस इच्छुकाच्या मुलाखतीसाठी उपस्थित होते. आपण शहादा- तळोदा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. या आधीही आपण इच्छुक होतो पण उमेदवारी मिळाली नव्हती असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष आपल्याला उमदेवारी देईल असा त्यांना विश्वास आहे. तसे झाल्यास विद्यमान भाजप आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढू शकते.
ट्रेंडिंग बातमी - मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
एकीकडे भाजप नेते राजेंद्र गावित यांनी पक्षाला रामराम केला असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी ही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. उदेसिंग पाडवी हे ही काँग्रेस मधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सदस्य पदाच्या राजीनामा दिलेला नाही. आपल्याला आघाडीकडून उमेदवारी मिळाली अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तेही गावित यांच्या प्रमाणेच शहादा मतदार संघातून इच्छुक आहेत.
ट्रेंडिंग बातमी - सिडकोच्या रेल्वे स्थानकाबाहेरील घरांची सोडत पुढे का ढकलली? कारण आले समोर
काही दिवसापूर्वी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही भाजपला रामराम केला होता. त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला आदिवासी पट्ट्यामध्ये एकामागून एक धक्के बसत आहेत. लोकसभा निवडणुकीतही आदिवासी समाज हा काँग्रेसच्या मागे उभा राहीला होता. त्यामुळे विधानसभेला अनेक नेते काँग्रेसकडे येत आहेत. या घडामोडींमुळे काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. शिवाय राजेंद्र गावित आणि इदेसिंग पाडवी यांच्या प्रवेशाने पक्षाचीही ताकत नक्कीच वाढणार आहे.