सिडकीची नवी मुंबईतल्या रेल्वे स्थानकाबाहेरील घरांची सोडत 2 ऑक्टोबरला निघणार होती. मात्र ही तारीख 7 ऑक्टोबर करण्यात आली. मात्र या तारखेलाही सोडत निघेल की नाही याबाबत शंका आहे. सिडकोची 26 हजार 667 घरांची सोडत निघणार होती. ही सर्व घरे नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यातील अनेक घरे तर रेल्वे स्थानका शेजारीच आहेत.त्यामुळे परवडणाऱ्या या घरांच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र जाहीर केलेल्या तारखेला आताही सोडत होणार नाही. ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र त्या मागचे कारण आता समोर आले आहे. त्यामुळे नव्या तारखेची प्रतिक्षा सर्वांनाच करावी लागणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या घरांची सोडत 7 ऑक्टोबरला होईल असे सांगितले होते. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली होती. मात्र सोडतीमधील ऑनलाइन प्रक्रियेत घरांचा राखीव प्रवर्गाची वर्गवारी, त्याच बरोबर इतर काही तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. असे असतानाही ही सोडत 8 ऑक्टोबर आधी घ्यावी अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता लागण्या पूर्वी ही सोडत व्हावी अशा सुचना सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
नवी मुंबईतील खारघर,कामोठे, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वे स्थानका जवळ ही घरे आहे. शिवाय घणसोली आणि तळोज्यातही सिडकोने घरे बांधली आहे. जवळपास 26 विविध ठिकाणी 43 हजार घरे बांधून तयार आहेत. याच घरांची सोडत सिडको मंडळाला काढायची आहे. ही घरे ज्या इमारतीत आहे त्या 11 ते 20 मजल्याच्या आहेत. आर्थिक दुर्बल उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये ही घरे मिळणार आहेत. सिडकोने पहिल्यांदाच या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धोरणातून ही सोडत काढली जाणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: वेंगुर्ले तालुक्यातील निवती समुद्रात बोट बुडाली, दोघांचा मृत्यू
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दसऱ्याला हा घरांची सोडत होईल असे सांगितले होते. तर सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी 2 ऑक्टोबरला सोडत होईल असं जाहीर केले होते. मात्र सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर शिरसाट यांनी नवी तारीख देत 7 ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र शुक्रवारी सिडकोच्या पणन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोडतीची अंतिम तयारी झालेली नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही नियोजित तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world