मुंबई:
राज्याच्या उन्नती आणि विकासासाठी पक्षाची ध्येयधोरणं जाणून घेण्यासाठी संकल्पपत्र महत्त्वाचं ठरतं. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं (BJP Manifesto 2024) प्रसारित करण्यात आलं. यावेळी आपल्या संकल्पपत्रात भाजपच्या ध्येय धोरणांचा उल्लेख आहे. राज्याच्या विकासासाठी काय काय करता येईल, याचं प्लानिगं पक्षांनी आपल्या संकल्पपत्रात दिलं आहे.
भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा..
- शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणणार
- 25 लाख रोजगाराची निर्मिती करणार
- शेतकरी कर्जमाफीचा आमचा संकल्प
- वृद्ध पेन्शन धारकांना 2,100 निधी देणार
- शेतमालाची हमीभावाने खरेदी करणार
- जीवनावश्यव वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार
- कौशल्य जनगणना करणार
- छत्रपती आकांक्षा केंद्र सुरु करणार
- मेक इन महाराष्ट्र : अंमलबजावणी, एअरनोटीकल आणि स्पेस यात शेती वापर करणार
- ओबीसी, ईबीसींसाठी शैक्षणिक शुल्कांची प्रतीपूर्ती करणार
- गडकिल्ल्यांच्या विकासाकरिता प्राधिकरण..
- स्वामी विवेकानंद फिटनेस कार्ड तयार करणार
- वद्धांना पेन्शन म्हणून 1500 रु. ऐवजी 2100 मिळणार
- महाराष्ट्रात देशातली पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवांसाठी एकत्रित धोरण राबवणार
- सक्तीच्या धर्मांतरणाविरोधात कायदा करणार