'सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची कडवट टीका

Gopichand Padalkar vs Supriya Sule : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैऱ्या झडत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
सांगली:

शरद सातपुते, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपच्या फैऱ्या झडत आहेत. जरांगे-शिंदे-पवारसे बैर नही,देवेंद्र फडणवीस तेरी खैर नही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर भाजपा आमदार गोपिचंद पडाळकर यांनी उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणजे किडकी बहीण आहेत, अशी टीका पडाळकर यांनी केलीय. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांवरही टीका केलीय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा

जरांगे - शिंदे आणि पवार हे तिघही मराठा म्हणून जरांगे-शिंदेंबद्दल बोलायचं नाही.  देवेंद्र फडणवीस ब्राम्हण म्हणून पद्धतशीर टार्गेट केलं जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव घेऊन संभ्रम निर्माण केला जातोय मुख्यमंत्र्यांनी यावर हस्तक्षेप करावा, अशी मागणी पडाळकर यांनी केली. 

'फडणवीसांना टार्गेट केलं जातंय'

फडणवीस यांना पद्धतशीरपणे टार्गेट केलं जातंय. माणसं पेरायची. विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं, काही पत्रकारांना हाती धरायचं आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची. स्वत:ला पुरोगामी म्हणायचं आणि राजर्षी शाहू महाराजांचे वारस संभाजी महाराजांना देवेंद्र फडणवीसांनी खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आता पेशवे छत्रपतींना नेमतात, अशी वक्तव्य करायची. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा खासदार करण्यापूर्वी राजर्षी शाहू महाराजांच्या वारसांना तुम्ही कधीही खासदारकी दिली नव्हती, अशी आठवण पडाळकर यांनी करुन दिली. 

( नक्की वाचा : 2 बड्या नेत्यांमुळे भाजपा प्रवेश रखडला, एकनाथ खडसेंनी थेट नावं सांगितली )
 

आज महाराष्ट्रात जे जातीयवादाचा विष पेरलं जातंय त्याकडं महाराष्ट्रातील जनता सूज्ञपणे पाहत आहे. पवारांचा एक फॉर्म्युला आहे, पुरोगामीत्वाच्या बाता हाणायाच्या आणि जातीयवादावर चर्चा घडवायच्या. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरले, ते कशातच सापडत नाहीत, तर त्यांच्या जातीवरती बोला, हा प्रकार सुरु असल्याचं पडाळकर यांनी सांगितलं. 

Advertisement

लहानपणापासून शरद पवारांकडून जे सुप्रिया सुळे शिकल्या, शरद पवार हे जातीयवादाचा विद्यापीठ आहे. त्यामुळे लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तशी लेक. अजित पवारांनाही सहानुभूती दाखावयाची नाही, असं सुप्रिया सुळे बोलतात. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत, आणि सुप्रीय सुळे स्वत:मधील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

( नक्की वाचा : ठाकरेंचा नवा डाव, मुंबईत 22 जागांवर लढण्याची तयारी... वाचा संभाव्य यादी )
 

Topics mentioned in this article