भाजपचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात? जागा वाटपावरून रस्सीखेच

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार भाजपमधील काही आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर आता मविआमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार भाजपमधील काही आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये नाराज असल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असेही त्यांचे म्हणणे आहे. शिवाय विदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा वाटपात मोठा वाटा हवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनिल देशमुखांचा दावा काय? 
 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. महायुतीचे अनेक नेते शरद पवारांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले. भाजपमध्ये अनेक आमदार नाराज असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान मविआ तर्फे प्रत्येक मतदार संघात सर्वे केला जाणार आहे. त्यानंतर कोणत्या मतदार संघातून निवडूक लढायची हे राष्ट्रवादी ठरवेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.   

ट्रेंडिंग बातमी -  लाडका भाऊ योजनेत बहिणीला ही संधी, समोर आली नवी माहिती

'विदर्भात जास्त जागा मिळाव्यात'

विदर्भात राष्ट्रवादीला अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. नागपूर शहरात दोन जागा मिळाव्यात असेही ते म्हणाले. आपला मुलगा सलील देशमुख चांगले काम करत आहे. त्यामुळे काटोल मतदार संघातून स्वत: लढणार की सलील लढणार हे अजून ठरायचे असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. पक्ष जो आदेश देईल तो पालन करू असं त्यांनी सांगितले. तर वर्धा जिल्ह्यातीला आर्वी मतदार संघावर त्यांनी दावा केला. या मतदार संघातून अमर काळे हे प्रतिनिधीत्व करत होते. आता ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्यामुळे तो मतदार संघ राष्ट्रवादीला मिळावा असे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  ठाकरेंचं ठरलं! मुंबईतल्या कोणत्या जागा लढणार? यादी आली समोर

वर्ध्यातील जागांवर काँग्रेसचा दावा 

वर्धा जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या जागा काँग्रेसला मिळाल्या पाहीजेत. त्या जागांवर काँग्रेसचा दावा आहे.  शिवाय महाविकास आघाडीत विदर्भात अधिकाधिक जागा काँग्रेसला मिळाव्या, अशी आग्रही भूमिका  काँग्रेसचे जिल्हा निरिक्षक आमदार अभिजित वंजारी यांनी मांडली आहे. 
 

Advertisement