विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये चांगलेच खटके उडण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर आरोपांच्या फैरी करत एकच खळबळ उडवून दिली आहे. रामदास भाईंच्या आरोपांनी भाजप घायळ झाली आहे. त्यामुळे भाजपनेही आता पलटवार करत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहे. अशा स्थितीत शिवसेना विरूद्ध भाजप यांच्यातला हा वाद आणखी पेटण्याची दाट शक्यता आहे. भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनाला सर्वात जास्त त्रास हा भाजपचाच आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपमुळेच शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले असे एकामागून एक आरोप रामदास कदम यांनी केली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपचे प्रत्युत्तर काय?
रामदास कदम यांच्या आरोपांना भाजपने जोरदार उत्तर दिले आहे. रामदास कदम हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी जाहीर पणे असे वक्तव्य करणे योग्य नाही असे भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले. त्यांनी असे बोलणे टालले पाहीजे जेणे करून दोन्ही पक्षात वितुष्ठ निर्माण होईल. आता जर उणीधुणी काढत कोणी बसले तर ते योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले. त्यांच्या काही तक्रारी असतील तर बैठकीत त्या गोष्टी बोलल्या पाहीजेत असेही ते म्हणाले. त्यांनी जे काय आरोप केले आहेत ते आश्चर्यकारक असल्याचेही दरेकर म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले
दापोलीतून किती मताधिक्य दिलं?
मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर केलेले आरोपही भाजपच्या जिव्हारी लागले आहेत. याला चांगलेच उत्तर देण्यात आले आहे. दापोलीत भाजपचाच सर्वात जास्त त्रास आम्हाला आहे असा आरोप रामदास कदम यांनी केली आहे. त्यावर बोलताना दरेकर यांनी कदम यांना कोंडीत पकडलं आहे. दापोलीतून महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही कितीचे मताधिक्य दिले? याचं उत्तर कदमांकडे आहे का? असा प्रश्न दरेकर यांनी केला आहे. दापोलीत झालेलं मतदान काय दाखवून देतं? अशी विचारणाही दरेकर यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीत राहून मंत्री किंवा नेत्या विषयी बोलणं चुकीचं असल्याचे ते म्हणाले.
'रविंद्र चव्हाणांमुळेच कोकणात यश'
रविंद्र चव्हाण यांच्यामुळेच कोकणात यश मिळाले आहे असा दावाही भाजपने केला आहे. असा दावा करत कदम यांच्या आरोपातली हवाच काढण्यात आली आहे. ऐवढेच नाही तर ठाणे आणि कल्याणची जागाही जीवाची बाजी लावून चव्हाण यांनीच निवडून आणली आहे असेही दरेकर म्हणाले. असे असताना चव्हाण यांच्यावर कदम यांनी केलेले आरोप हे दुर्दैवी असल्याचे दरेकर म्हणाले.