अमोल सराफ, बुलढाणा:
Buldhana Crime: बुलढाण्यातून सायबर गुन्ह्याची एक भयंकर घटना समोर आली आहे. विवाहित महिलेचा मोबाईल हॅक करुन, तिच्या संपूर्ण मोबाईलचा डेटा मिळवत ब्लॅकमेल करत विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम आरोपीने पिडीतेकडे ब्लॅकमेल करत शरीर सुखाचीही मागणी केली. याप्रकरणी बुलढाण्यातील सोनाळा पोलीस यांनी ऋषिकेश गिरी (वय वर्ष, 27) नावाच्या आरोपीवर विविध कलमाने गुन्हा दाखल केला असून. तपासाचे चक्र वेगाने फिरवत आरोपीला अटक करण्याच्या करिता पोलीस कामाला लागली आहे.
मोबाईल हॅक अन् सुरु झाला भयंकर छळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडिता ही विवाहित असून आरोपी ऋषिकेश याने तिचा मोबाईल बेकायदेशीरपणे हॅक केला. मोबाईल हॅक केल्यानंतर त्यातील वॉट्सअप चॅट, तसेच गॅलरीमधील सर्वा खासगी डेटा, ई-मेलचा ताबा मिळवला. या सर्व खासगी फोटोंचा वापर करुन त्याने महिलेला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. हे फोटो पतीला व नातेवाईकांना ते पाठवून बदनाम करेल अशी धमकी देत तिचा छळ सुरू केला.
संतापजनक प्रकार म्हणजे एवढ्यावरच न थांबता या नराधमाने ब्लॅकमेल करत पीडितेला विवस्त्र होण्यास भाग पाडले. त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंग करुन तिच्या बहिणीला पाठवले तसेच तू माझ्याशी शारीरीक संबंध ठेव नाहीतर तुला ठार मारेल, अशी धमकीही दिली. या सततच्या छळाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडीत महिलेने थेट पोलिसात धाव घेतली.
पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु
पीडित महिलेने सोनाळा पोलीस ठाण्यात तोंडी दिलेल्या तक्रारीवरून तक्रार नोंदवत पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर ओळखून कारवाई करत कलम 67 /2026, नुसार 75 ( 1) 75 ( 2) 77 78 352 351 2 351 356 ( 2) bns 20 23 सह कलम 66 (E )67 (A) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार तात्काळ गुन्हा दाखल केला आहे, सध्या आरोपी ऋषिकेश गिरी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकंदरीत सायबर सुरक्षा बाबत वेळोवेळी जनजागृती लोकांना जागृत राहण्याचे आव्हान केल्यानंतर देखील अशा मोठ्या खळबळ जनक घटना घडत आहेत, याला निश्चितच कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे.