Cabinet Portfolio: जे खातं वडिलांच्या वाट्याला आलं तेच खातं लेकांना ही मिळालं, 'ते' दोन मंत्री कोण?

पहिल्यांदा त्यांना जी खाती मिळाली होती तिच खाती त्यांच्या मुलांनाही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर मिळाली आहे. हा एक योगायोग समजला जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महायुती सरकारचे अखेर खाते वाटपही झाले. आधी मंत्रिमंडळ विस्तार मग खाते वाटते. असे एकएक अडथळे पार करत महायुतीचे मंत्री आता कामाला लागतील. या मंत्रिमंडळातील खाते वाटपात एक योगायोग जुळून आला आहे. तो म्हणजे या मंत्रिमंडळातले दोन मंत्री असे आहेत की त्यांच्या वडिलांनीही राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलं होतं. शिवाय पहिल्यांदा त्यांना जी खाती मिळाली होती तिच खाती त्यांच्या मुलांनाही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर मिळाली आहे. हा एक योगायोग समजला जात आहे. विशेष म्हणजे ही बापलेकांची जोडी कोकणातलीच आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुती सरकारमध्ये दोन असे मंत्री आहेत, त्यांच्या वडिलांनीही राज्याच्या मंत्रिमंडळात या आधी काम केलं आहे. शिवाय त्यांना जी खाती आधी मिळाली होती तिच खाती त्यांच्या मुलांनाही पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मिळाली आहे. नारायण राणे आणि रामदास कदम यांनी 1995 साली युतीचे सरकार आल्यानंतर मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं होतं. त्यावेळी नारायण राणे यांच्या वर आधी मत्सपालन व बंदरे या खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर रामदास कदम हे गृह राज्यमंत्री होते.  

ट्रेंडिंग बातमी - Cabinet Portfolio: CM फडणवीसांची ताकद, साताऱ्याचा दबदबा अन् दिग्गजांची कोंडी, खाते वाटपातील 10 वैशिष्ट्ये

त्यानंतर जवळपास 29 वर्षांनी तोच योगायोग जुळून आला आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. या महायुती सरकारमध्ये नारायण राणे यांचे पुत्र नितशे राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बरोबर 29 वर्षापूर्वीही या दोन मंत्र्यांच्या वडिलांनीही एकाने कॅबिनेट तर दुसऱ्याने राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. नारायण राणे हे कॅबिनेट तर रामदास कदम हे राज्यमंत्री होते. त्याच्या लेकांनीही आता त्याचीच पुनर्रावृत्ती केली आहे. हा एक योगायोग म्हणावा लागेल. 

ट्रेंडिंग बातमी - Cabinet Portfolio: खातेवाटपात महत्वाची खाती भाजपकडे , शिवसेना- राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती?

नितेश राणे यांच्यावर मत्ससंवर्धन आणि बंदरे या खात्याची जबाबदारी असणार आहे. काधी काळी नारायण राणे यांनी ही खाती सांभाळली आहेत. तिच खाती आता नितेश राणे यांच्या वाट्याला आली आहे. नितेश राणे हे कोकणातून येतात. त्यामुळेच त्यांना ही खाती देण्यात आली आहेत. तर दुसरीकडे योगेश कदम हे राज्यमंत्री झाले आहे. असं असलं तरी त्यांच्याकडे सर्वच वजनदार खात्यांची जाबाबदारी आहे. त्यात गृह खाते हे महत्वाचे आहे. त्यांचे वडिल रामदास कदम हे ज्या वेळी पहिल्यांदा मंत्री झाले होते त्यावेळी त्यांच्यावर गृहराज्यमंत्रिपदाचीच जबाबदारी देण्यात आली होती. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती

नारायण राणे आणि रामदास कदम यांनी आपल्या मंत्रिपदाची छाप राज्यात सोडली होती. नारायण राणे हे पुढे महसूल मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यापदापर्यंत पोहोचले. तर रामदास कदम हे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री ते विरोधी पक्षनेत्या पर्यंत पोहोचले. या नेत्यांनी चढ्या क्रमांनी पदांना गवसणी घातली. आता त्यांच्या ऐवजी त्यांची मुलं रिंगणात आहेत. त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या संधीचे ते कसे सोनं करतात ते आता पाहावं लागणार आहे. शिवाय कोकणाला या दोन तरूण नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याने कोकणाला त्याचा किती फायदा होतो हे ही पहावं लागणार आहे.