जाहिरात

खैरे विरूद्ध दानवे? संभाजीनगरात सेनेची दोन आंदोलने का?

छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात होते. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरातील शिवसेना भवना समोर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वेगळं आंदोलन केलं.

खैरे विरूद्ध दानवे? संभाजीनगरात सेनेची दोन आंदोलने का?
छत्रपती संभाजीनगर:

बदलापूर प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मुक आंदोलनाची घोषणा केली होती. यासाठी सर्वांनी एकत्र येवून राज्य सरकारचा निषेध करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. पण त्यांचे हे आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यां पर्यंत पोहोचले की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात होते. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरातील शिवसेना भवना समोर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वेगळं आंदोलन केलं. त्यामुळे आंदोलना पेक्षा ठाकरे गटातील गटबाजीची चर्चा शहरात अधिक झाली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ठाकरे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर आज शनिवारी संभाजीनगर शहरात ठाकरे गटाकडून क्रांती चौकात तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आलेच नाहीत. त्यामुळे खैरे का आले नाहीत याची चर्चा सुरू झाली. खैरे आणि दानवे यांच्यातील नाते हे सर्वश्रूत आहे.    

ट्रेंडिंग बातमी - भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, कार्यकर्त्यांना दिली शपथ

याबाबत चंद्रकांत खैरे यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली. ते काही एकाच ठिकाणी करायचे नव्हते. जे आंदोलन दानवेंच्या नेतृत्वात करण्यात आले त्याबाबत आपल्याला कळवलं नव्हतं. कदाचीत ते विसरले असतील. मी बाहेर होतो त्यामुळेही हे झाले असले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेना भवना बाहेर  उद्धव ठाकरेंच्या आदेशा नुसार आपण आंदोलन केल्याचे खैरे यांनी सांगितले. दरम्यान मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो पण तसं करण्याची कोणाची हिंम्मत नाही. ते तसे करू शकत नाही. मी वस्ताद आहे, अशा शब्दात खैरेनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना फटकारलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com